काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरु ; उद्योजक गणेश गायकवाड यांचा समर्थकांसह कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

Maharashtra Today

मुंबई : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांची नियुक्ती झाल्यानंतर कॉंग्रेसमध्येही आता जोरदार इनकमिंगला सुरुवात ( Incoming Congress begins)झाली आहे . युवकांमध्ये लोकप्रिय व शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असलेले सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक गणेश गायकवाड यांनी आपल्या समर्थकांसह कॉंग्रेसमध्ये प्रवेश (Ganesh Gaikwad joins Congress) केला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशावेळी कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे व नानासाहेब गायकवाड उपस्थित होते.

गायकवाड यांच्या कॉंग्रेस प्रवेशाने भाजपला (BJP) धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. तसेच, राष्ट्रवादी कॉंग्रेस ही गायकवाड यांना पक्षात घेण्यासाठी प्रयत्नशील होती. मात्र, त्यांच्या कॉंग्रेस प्रवेशाने राष्ट्रवादीलाही धक्का बसल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

पटोले यांच्या नेतृत्त्वावर विश्‍वास ठेवत कॉंग्रेसमध्ये आपण प्रवेश केल्याचे गायकवाड म्हणाले . तर दुसरीकडे गायकवाड यांच्या पक्षप्रवेशावर नाना पटोले यांनीही प्रतिक्रिया दिली. ‘गायकवाड यांच्या प्रवेशाने शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कॉंग्रेसला मोठे बळ मिळेल. तसेच, तरुणांमधील गायकवाड यांच्या संपर्काचा कॉंगेसच्या वाढीसाठी उपयोग होणार आहे. बाधंकाम आणि उद्योग क्षेत्रातील गायकवाड यांच्या प्रतिमेचा देखील कॉंग्रेस पक्षाला उपयोग होणार असून त्यांच्यावर प्रदेश पातळीवरील मोठी जबाबदारी दिली जाईल.

ही बातमी पण वाचा : केंद्र सरकारने देशवासीयांना कोरोना लस विनामूल्य उपलब्ध करून द्यावी : नाना पटोले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button