प्राप्तिकर विभागातील निरीक्षक १० लाखांची लाच घेताना जाळ्यात

Kolhapur

कोल्हापूर :- एका डॉक्टरावर छापा न टाकण्यासाठी १० लाख रुपयांची लाच घेणाऱ्या प्राप्तिकर विभागातील निरीक्षक प्रताप महादेव चव्हाण हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले. लाचलुचत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी ही कारवाई केली. लक्ष्मीपुरी परिसरातील विल्सन पूल परिसरात ही कारवाई झाली. ३४ वर्षीय प्रताप चव्हाण हे राजारामपुरी येथील आहेत.

करवीर तालुक्यातील एका डॉक्टरावर छापा न टाकण्यासाठी  प्राप्तिकर विभागाचे  निरीक्षक चव्हाण यांनी २५ लाख रुपयांची मागणी केली होती. कालपासून त्यासाठी तडजोड सुरू होती. १४ लाख रुपयांवर तडजोड झाली. तडजोडीनुसार शुक्रवारी, दुपारी १० लाख रुपयांचे ठरले होते. दरम्यान या कालावधीत संबंधित डॉक्टरने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. आणि त्यांच्याकडे प्राप्तिकर विभागाचे निरीक्षक चव्हाण यांच्याविषयी तक्रार केली. शुक्रवारी, १० लाख रुपयांची लाच घेताना चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER