2024 च्या पॕरिस आॕलिम्पिकमध्ये ‘ब्रेकिंग’चा खेळ म्हणून समावेश

Paris Olympic 2024

ब्रेकडान्सिंगचा (Breakdancing) स्पर्धात्मक भाग असलेल्या ‘ब्रेकिंग’ला (Breaking) एक क्रीडा प्रकार म्हणून 2024 च्या पॕरिस आॕलिम्पिकसाठी (Paris 2024) स्थान देण्यात आहे. टोकियो आॕलिम्पिकमध्ये (Tokyo 2020) सर्फिंग, स्केटबोर्डिंग आणि क्लायम्बिंग हे तीन नवे क्रीडाप्रकार असतील. त्यात 2024 मध्ये ब्रेकिंगची भर पडेल. मात्र पार्कर (Parkour) या खेळाला मात्र आॕलिम्पिकमध्ये स्थान मिळू शकलेले नाही. पार्करमध्ये अडथळ्यांवरुन धावणे, उडी मारणे व चढणे याचा समावेश असतो.

ब्रिटीश ब्रेकडान्सर करमसिंग याने म्हटलेय की, ब्रेक्रिंगसाठी ही फार मोठी गोष्ट आहे कारण त्याला आता खेळ म्हणून मान्यता मिळणार आहे. आणि पारंपरिक खेळांऐवजी इतर प्रकार पसंत करणारे खेळाडू याकडे आकर्षित होतील.

पार्कर प्रमाणेच स्क्वॕश, बिलियर्ड स्पोर्ट आणि बुध्दिबळाचेही आॕलिम्पिक समावेशाचे प्रयत्न अपुरे पडले.

ब्रेकींगमध्ये कलात्मकता व क्रीडा कौशल्याचा समावेश आहे. त्यात नृत्यामध्ये पदलालित्य, हालचाली आणि स्थिरता याला महत्त्व असते. हालचालींमध्ये फिरक असते तर स्थिरतेमध्ये खेळाडू कशाप्रकारची पोझ देतो ते महत्त्वाचे असते. बी- बाॕईज आणि बी- गर्ल्स या गटात खेळाडू सहभागी होतात. त्यात खेळाडूंचे तांत्रिक कौशल्यांसह कल्पकता व शैली, ताकद, गती, लय आणि चापल्य याच्याआधारे मुल्यमापन केले जाते.

गेल्या वर्षी, पॕरिस 2024 च्या आयोजन समितीने ब्रेकींग, सर्फिंग, स्केटबोर्डिंग आणि क्लायम्बिंग यांच्या समावेशाचा प्रस्ताव दिला होता आणि आंतरराष्ट्रीय आॕलिम्पिक परिषदेच्या (IOC) कार्यकारी मंडळाची संमतीची त्यांना प्रतिक्षा होती. त्यावर आयओसीने म्हटले होते की जे खेळ पॕरिस 2024 ची मैदाने वापरतील आणि ज्या खेळाडूंना युवा वर्गात लोकप्रियता आहे आणि जे लैगिक समानतेला सहायक ठरतील अशा खेळांचा समावेश करण्यात येईल. आयओसीने टोकियो आॕलिम्पिकपासूनच निर्णय घेतलाय की यजमान त्यांच्या देशात लोकप्रिय असलेल्या आणि आॕलिम्पिकचे आकर्षण वाढवू शकणाऱ्या खेळांच्या समावेशासाठी प्रस्ताव देऊ शकतात.

दरम्यान, आॕलिम्पिकमध्ये काटकसरीचा भाग म्हणून रियो 2016 मधील असलेली खेळाडूंची संख्या 11 हजार 238 वरुन पॕरिस 2024 मध्ये 10 हजार 500 असेल. पॕरिसमध्ये बेसबॉल/ साॕफ्टबॉल आणि कराटे यांना वगळण्यात येणार असल्याने ही संख्या मर्यादित ठेवणे शक्य होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER