भीमा कोरेगावच्या इतिहासाचा शालेय पाठ्यपुस्तकात समावेश करा – रामदास आठवले

Ramdas Athawale - Bhima Koregaon

पुणे : कोरेगाव भीमा येथील लढाईचा इतिहासाच्या पाठ्यपुस्तकामध्ये समावेश झाला पाहिजे, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाई नेते रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली. कोरेगाव भीमाचा (Bhima – Koregaon) इतिहास शाळांमध्ये शिकवला गेला पाहिजे. त्यासाठी मी शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहीन व त्यांच्याशी चर्चाही करेन, असे रामदास आठवले यांनी सांगितले. (Ramdas Athawale pay tribute to Bhima Koregaon war memorial)

रामदास आठवले यांनी शुक्रवारी कोरेगाव भीमा येथे जाऊन विजयस्तंभाला अभिवादन केले. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. देशात दलित समाजावर होणारे अत्याचार थांबले पाहिजेत. त्यासाठी देशात समता प्रस्थापित झाली पाहिजे. तसेच देशातील दलित-सवर्ण हा वाद मिटला पाहिजे. गावागावात एकी झाली पाहिजे. सवर्ण आणि दलितांमध्ये एकी झाली की, देशाचा विकास झपाट्याने होईल. 2021 मध्ये दलितांना न्याय देण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध असल्याचा दावा रामदास आठवले यांनी केला.

नवीन वर्षात पक्ष मजबूत करणार –

नवीन वर्षात रिपब्लिकन पक्ष देशभरात मजबूत करण्याचा आमचा संकल्प आहे. ‘मी रिपब्लिकन’ ही आमची घोषणा असेल, असे आठवलेंनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER