नाशिकमधील घटना हृदय पिळवटून टाकणारी – नरेंद्र मोदी

Nashik Zakir Hussain Hospital - PM Narendra Modi

मुंबई : नाशिकमधील महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय (Dr. Zakir Hussain Hospital) येथे ऑक्सिजन टाकीतून गळती होऊन २२ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शोक व्यक्त केला आहे. ही घटना हृदय पिळवटून टाकणारी असून यामुळे मला अतिशय दु:ख झाले आहे. या क्षणी मी मृतांच्या कुटुंबीयांचे सात्वन करतो, असे त्यांनी म्हटले. ट्विटरद्वारे त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

नाशिक पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात टँकरमधून ऑक्सिजन टँकमध्ये भरताना गळती झाली होती. यामुळे रुग्णालयात पुरवठा सुरू असणाऱ्या ऑक्सिजनचा दाब कमी झाला आणि ऑक्सिजनअभावी २२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही दुर्घटना घडली त्यावेळी जवळपास १५० रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. तर, जवळपास ३० ते ३५ जण मृत्यूच्या दाढेत असल्याचा दावा केला जात आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button