राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने दिव्य प्रकल्पाचे आ.गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांग, मनोरुग्ण आणि बेघरांच्या हक्काच्या घराचे दरवाजे खुले...

बुलडाणा : दिव्यांग, अनाथ, बेघर, बेसहारा मनोरुग्ण,निराधार, यांच्यासाठी कायमचा निवारा उपलब्ध व्हावा यासाठी दिव्या फाऊंडेशनच्या माध्यमातून लोकसहभागातून दिव्या प्रकल्पाचे (Divya project) बांधकाम पूर्ण झाले असून, शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले , यावेळी प्रकल्पावर छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, तर आज पासून बेघरांसाठी त्यांच्या हक्काच्या घराचे दरवाजे आजपासून खुले झाले आहेत.

गेल्या अनेक वर्षापासून संपूर्ण राज्यामध्ये दिव्या फाउंडेशनच्या माध्यमातून दिव्यांग, बेघर,बेसहारा व्यक्तींची सेवा केली जात आहे, मात्र हे कार्य करत असताना त्यांना कायमचा निवारा उपलब्ध व्हावा यासाठी दिव्या फाउंडेशन ने बुलडाणा – खामगाव रोड वरील वरवंड येथे लोकसहभागातून दिव्य प्रकल्पाच्या उभारणीला सुरुवात केली होती या प्रकल्पाचे हे बांधकाम पूर्ण झाले असून आज पासून बेघरांच्या हक्काच्या घराचे दरवाजे त्यांच्यासाठी आजपासून खुली झाले आहेत, त्यामुळे शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने या प्रकल्पाचे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले… दिव्य फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या समाजकार्याची माहिती घेऊन यापुढे दिव्य प्रकल्पाला लवकरच आमदार निधीतून सभामंडप देण्यात येणार असून भविष्यातही प्रकल्पाच्या विकास कामासाठी निधी देण्याचे आश्वासन आमदार गायकवाड यांनी दिले आहे.

तर आज उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने प्रा.गणेश देशमुख यांनी साहित्याच्या स्वरूपात 25 हजार रुपयाची मदत दिली आहे.

त्याच बरोबर या समाजकार्यात दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन सढळ हाताने मदत करावी ,त्याच बरोबर दिव्यांग, बेघर, मनोरुग्ण आढळल्यास त्यांनी दिव्या फाऊंडेशनच्या दिव्य प्रकल्पामध्ये त्याला आणून द्यावे ,अन्यथा दिव्य प्रकल्पाला तसी माहिती कळवावी असे आवाहन सुद्धा या निमित्ताने दिव्य फाउंडेशन कडून करण्यात आले आहे यावेळी संस्थेचे चीफ डायरेक्टर आशिष खडसे,योगेश सिंगरकर,सुनील तिजारे,राजेंद्र टिकार, विलास भिसे, आंनद सुरडकर भीमराव राठोड, वरवंड सरपंच बाळूभाऊ जेउघाले हेमंतबापू देशमुख,बाळा चव्हाण,राहुल सुरडकर राजेश टारपे नंदिनी टारपे,ज्योती गवई,शैलेश स्वप्निल ढवळे बुलडाणा कट्टा गजानन अवसरमोल संस्थापक अशोक ककडे दिव्या फाऊंडेशन परिवार उपस्थिती होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button