मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-नारायण राणे एकाच मंचावर येणार

Narayan Rane & Uddhav Thackeray

मुंबई : सिंधुदुर्गमधील बहुचर्चित चिपी विमानतळाचे अखेर 23 जानेवारीला सकाळी 10 वाजता उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि भाजपचे नेते तसेच माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे बऱ्याच वर्षानंतर एकत्र येणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले गेले आहे.

पूर्वी शिवसेनेत असलेल्या नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांचे वाद संपूर्ण राज्याला माहिती आहेत. नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पूत्र निलेश आणि नितेश राणे सातत्याने उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका करत असतात. तर शिवसेनेचे नेतेदेखील राणेंना प्रत्युत्तर देतात. अशा परिस्थितीत ठाकरे आणि राणे एकाच मंचावर एकत्र येणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत .

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून 23 जानेवारीला चिपी विमानतळाचे उद्घाटन केले जाणार आहे. संबंधित आय. आर. बी. कंपनीने याबाबतची माहिती दिली आहे. चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मोठ्या कालावधीनंतर नारायण राणे आणि उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर एकत्र दिसणार आहेत. या विमानतळाचे उद्घाटन प्रजासत्ताक दिनी (26 जानेवारी) होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. परंतु आता बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी या विमानतळाचे उद्घाटन होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER