नागपुरातील सर्वात मोठ्या ऑरा स्टोअरचे अभिनेत्री भूमी पेडणेकर यांच्या हस्ते उदघाटन

Bhumi Pednekar

नागपूर : अभिनेत्री आणि स्टाइल आयकॉन भूमी पेडणेकर यांच्या हस्ते ऑरा या आजच्या काळातील स्टाइलबद्दल जागरुक महिला व नववधू यांच्यासाठीच्या ब्रायडल ज्वेलरी ब्रँडच्या शहरातील सर्वात मोठ्या स्टोअरचे उद्घाटन करण्यात आले. रचना गॅलेक्सी, अंबाझरी रोड, धरमपेठ येथे संपन्न झालेल्या उदघाटनाप्रसंगी ऑराचे प्रमोटर दिपू मेहता व ऑराचे सीओओ सेसिल दे सँता मारिया उपस्थित होते.

गडकरी महोदय, अनिल अंबानींच्या कंपनीवर एवढी मेहरबानी का?

ऑरा स्टोअरमधील पहिलावहिला ब्रायडल ज्वेलरी झोन नववधूंना व त्यांच्या कुटुंबांना पूर्णतः आरामदायीपणे चकाकते हिऱ्यांचे दागिने परिधान करून पाहण्याची सेवा देणार आहे. असे करतानाचा आनंद नववधूंना व त्यांच्या कुटुंबांना अनुभवता येणार आहे. ऑराची डिझाइन टीम त्यांचे समुपदेशन करेल आणि त्यांना जीवनातल्या या खास दिवशी अचूक नववधू म्हणून सजण्यासाठी मार्गदर्शन करेल. नव्या खास ब्रँड स्टोअरमध्ये वैशिष्ट्यपूर्ण ऑरा क्राउन स्टार सादर केले जाणार आहे. या कलेक्शनमध्ये, पेटंटेड नावीन्यपूर्ण डिझाइन परिधान करणयाचे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न पूर्ण केले जाणार आहे. यामध्ये, एरवी ५७ पैलू असणाऱ्या हिऱ्यांऐवजी ७३ पैलू असणारे हिरे वापरले जाणार आहेत. सोप्या शब्दांत सांगायचे तर, ऑराकडे ७३ पैलू असणारे हिरे आहेत आणि हे हिरे देशातील सर्वात चमकदार हिरे आहेत. क्राइन स्टारचा चमकदारपणा मशीनद्वारे तपसता येऊ शकतो. ऑरा स्टोअरमध्ये एक्स्ट्रा डायमंड नेकलेस कलेक्शन मांडण्यात आले आहे.

स्टोअरला भेट देणाऱ्या आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये खरेदी करणाऱ्या शहरातील महिलांना उद्घाटनपर विशेष ऑफर दिल्या जाणार आहेत. ऑरा फाइन ज्वेलरी प्रा. लि.चे प्रमोटर दिपू मेहता यांनी सांगितले, “आम्ही जवळजवळ दहा वर्षे नागपूर येथे कार्यरत असल्याने, आणखी मोठ्या जागेत जाण्यासाठी, तसेच नागपूरमधील वधूंसाठी काहीतरी वेगळे निर्माण करण्याची ही योग्य वेळ आहे, असे आम्हाला वाटले. हजार वर्षांतून एकदा येणारे दुर्मिळ रोमँटिक संतुलित वर्ष असणारे २०२० हे वर्ष नागपूरमधील दागिन्यांच्या चाहत्यांसाठी अतिशय खास बनवण्याचे ऑराचे उद्दिष्ट आहे. मध्यमवयीन व्यक्तींपासून तरुणांपर्यंत; मातांपासून विवाहाच्या वयात आलेल्या युवतींपर्यंत; प्रत्येकाला आता ऑरा डायमंड ज्वेलरी खरेदी करता येणार आहे.

ऑरा फाइन ज्वेलरी प्रा. लि.चे सीओओ सेसिल दे सँता मारिया यांनी नमूद केले, “टोकयो, हाँगकाँग, अँट्वर्प, मुंबई व न्यूयॉर्क येथे पाच जागतिक डिझाइन केंद्र असलेली ऑरा चेन डिझाइनच्या बाबतीत आणि उत्पादनामध्ये नावीन्य आणण्याच्या बाबतीत आघाडीवर आहे. दागिने घडवण्याचा शतकाहून जुना वारसा असणारे कुशल कारागीर ऑरासाठी अचूक डिझाइन तयार करतात. आम्ही भारतीय परंपरेचे आदरातिथ्य अबाधित ठेवून, आतंरराष्ट्रीय रिटेल फॉरमॅट्सच्या धर्तीवर नागपूरकरांना आंतरराष्ट्रीय रिटेल सेवेचा अनुभव देणार आहेत.”

ऑराकडे उत्कृष्ट कट डायमंड्सचे अनेक कलेक्शन सेट आहेत. सॉलिटेअर निरनिराळ्या आकारांमध्ये व कटमध्ये उपलब्ध असून, त्यांचे लक्षवेधक सौंदर्य त्यांच्या कटमध्ये सामावलेले आहे. ऑराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहेच, शिवाय मोस्ट इनोव्हेटिव्ह डिझाइन, रिटेलर ज्वेलर ऑफ द इयर, इ. गौरवही प्राप्त केले आहेत.