पश्चिम बंगालमध्ये भाजपला तीन आकडी संख्याही गाठता येणार नाही, राष्ट्रवादीचा दावा

Nawab Malik - Maharastra Today

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले असून, मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही पेट्रोल-डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात पदयात्रा काढली. या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीका केल्यानंतर आता पश्चिम बंगालमध्ये भाजपला दोन आकडी संख्येवर समाधान मानावे लागेल, असा दावा राष्ट्रवादीचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे.

सुप्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी आज तृणमूल काँग्रेसला (Trinamool Congress) रामराम करत भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. एकूणच परिस्थिती पाहता पश्चिम बंगालमध्ये भाजपला तीन आकडी संख्या गाठता येणार नाही, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

अन्य राज्यांच्या निवडणुकीत ज्या प्रकारे भाजप साम, दाम, दंड, भेद वापरत आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार येणार आहे, असे वातावरण निर्माण केले जात आहे, असे सांगत बंगालमध्ये दोन आकडी संख्येपेक्षा भाजपला जास्त जागा मिळू शकत नाही, ही खरी वस्तुस्थिती आहे, असा दावा नवाब मलिक यांनी केला. तसेच आसामध्ये देखील भाजप सत्तेतून बाहेर होणार आहे. निकालानंतर ५० ची संख्या राहील. मग अमित शाह यांनी कन्याकुमारीचा किंवा पंतप्रधान मोदींनी आसाम, बंगालचा दौरा केला तरी काही फरक पडणार नाही, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER