पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी बहुमताच्या जवळ, तर भाजप विरोधी पक्षाच्या जवळ

Maharashtra Today

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सत्तेसाठी तृणमूल काँग्रेस(TMC) आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर दिसून येत आहे. बंगालमध्ये २९५ जागांपैकी २५८ जागांचे कल हाती आले आहेत. त्यात तृणमूल काँग्रेसला १४५ आणि भाजपला ११० जागा मिळताना दिसत आहे. तर काँग्रेसला अवघ्या ६ जागा मिळताना दिसत असून सर्वात धक्कादायक म्हणजे कधी काळी डाव्यांचा गड असलेल्या बंगालमध्ये डाव्या पक्षाला एक जागा मिळताना दिसत आहे. त्यामुळे बंगालमधून डावे हद्दपार होणार की काय? अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या २९५ जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. बंगालमधील जागांचे कल हाती आले असून त्यानुसार भाजपने(BJP) बंगालमध्ये जोरदार मुसंडी मारलेली दिसत आहे. अवघ्या तीन जागा असलेल्या भाजपने ११० जागांपर्यंत उडी मारली आहे. तर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने १४५ जागांपर्यंत मजल मारली आहे. काँग्रेसला अवघ्या 6 जागा मिळताना दिसत आहे. ज्या डाव्या पक्षांनी बंगालमध्ये तीस वर्षे सत्ता उपभोगली. त्या बंगालमध्ये डाव्यांचा सुपडा साफ होताना दिसत आहे. त्यामुळे डाव्यांसाठी हा मोठा हादरा असल्याचं मानलं जात आहे. बंगालमध्ये भाजप आणि तृणमूलमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. केवळ काही जागांच्या फरकाने तृणमूल काँग्रेस पुढे आहे. त्यामुळे राज्यात सत्ता कुणाची येणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

 बातमी पण वाचा : पश्चिम बंगालमध्ये भाजपा आघाडीवर ; ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये पिछाडीवर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button