वर्धेत कोरोनाबाधितांची संख्या पोहचली १९ वर एका महिलेचा मृत्यू

Corona Positive

वर्धा : राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . वर्धा जिल्हा गेल्या पंधरा दिवसांपर्यंत हिरवा ठेवण्यात प्रशासन आणि नागरिकांनी केलेल्या परिश्रमावर पाणी फेरल्या जात असून बाहेरून आलेल्या रुग्णांमुळे करोना पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या रोज वाढत असल्याने जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या आज 19 झाली आहे . तसेच एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर येत आहे .

वर्धा जिल्हा ग्रीन झोन असल्याचा तुरा घेऊन फिरत असताना बाहेरून आलेल्यांमुळे जिल्ह्यात कोरोनाने पाय पसरने सुरू केले. गेल्या दोन दिवसात चार कोरोना रुग्ण आढळुन आल्याने आता नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. गावात आलेला कोरोना घरात कधी शिरेल हे सांगता येत नाही. जिल्हा प्रशासनाच्या सुचनेचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात मुंबई, पुणे तसेच रेड झोन मधून येणारे नागरिक कोरोना बाधित निघत असल्यामुळे जिल्ह्यात कोरोना बधितांच्या संख्येत वाढ होत आहे.

ही बातमी पण वाचा :सांगली जिल्ह्यात आणखीन सहा जण कोरोनाबाधित


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER