तीन महिन्यात ठाकरे सरकार पडेल, रावसाहेब दानवेंचे भाकीत

Mahavikas Aghadi - Raosaheb Danve

परभणी : राज्यात पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुका जवळ आल्या आहेत. १ डिसेंबर रोजी राज्यातील विविध विभागात मतदान होणार असून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध इतर पक्ष असा सामना रंगणार आहे. कोरोना (Corona) काळातील टाळेबंदीनंतर राज्यातील ही पहिलीच निवडणूक असल्यानं सर्वांचं लक्ष्य या निवडणुकांकडे लागलं असतानाच राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील वेग घेऊन लागले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापलं असून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार पडण्याबद्दल भाकीत केलं आहे.

या सरकारला वर्षपूर्ती होत असतानाच हे सरकार लवकरच पडेल अशी टीका भाजप नेत्यांनी पुन्हा सुरु केल्याचं दिसून येत आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात ठाकरे सरकार पडेल आणि आपले सरकार येईल. ते कसं येणार आहे, ते पत्रकारांना लवकरच कळवतो, अशी फटकेबाजी रावसाहेब दानवे यांनी केली. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारानिमित्त ते परभणीत बोलत होते. त्यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

कधी एकमेकांचे तोंडही न पाहणारे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार चालवत आहेत. पण येत्या दोन ते तीन महिन्यात महाविकास आघाडीचे सरकार पडेल आणि आपले सरकार येईल.

आपल्याला एकाचे पाच आणि पाचाचे पन्नास करायचे. कुटुंब नियोजन करायचं का? पक्षाचं नाही करायचं. पक्ष वाढला पाहिजे. विधानसभा लोकसभा निवडणुकांनंतर ही पहिली निवडणूक आहे, आपल्याला यश मिळालं पाहिजे. असं सांगत कार्यकर्त्यांना बूथनिहाय पुन्हा कामं जोमाने करण्याचं आवाहन करत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करून दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER