वाझे प्रकरणावर प्रकाश आंबडेकरही आक्रमक, राज्यपालांच्या भेटीची तारीख ठरली

Prakash Ambedkar - Sachin Vaze - Governor Bhagat Singh Koshyari

सोलापूर : मुंबईत (Mumbai) उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात एनआयएने (NIA) पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अटक केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण अधिकच तापले आहे. त्यातच आता या प्रकरणात निघाले वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी उडी घेतली आहे. या प्रकरणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

प्रकाश आंबेडकर यांनी आज सोलापूरमध्ये पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीकास्त्र सोडले. मुंबईमधील मायकल रोडवर एक स्फोटकांनी गाडी सापडली. या प्रकरणी मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे याला अटक करण्यात आली. या प्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहे. या प्रकरणात २२ तारखेला आम्ही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार असून त्यांच्यासमोर पक्षाची भूमिका मांडणार आहोत, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांना आता एकच काम उरले आहे. उठसूट पश्चिम बंगालला जायचं आणि राज्यातील निवडणुकामध्ये प्रचार करायचा. फक्त निवडणुकींसाठी एका राज्यात १७ वेळा जाणे, हे पंतप्रधानांना शोभणारे नाही. मोदींनी पंतप्रधान पदाची गरिमा घालवली आहे. त्यांच्यावर गल्लीतला कार्यकर्ता देखील टीका करत आहे. याचा भाजपने विचार केला पाहिजे’, असा टोलाही प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.

आघाडी सरकारने महाराष्ट्राचा बजेटसादर केला. काय बजेट आहे कोणाला माहिती नाही. कोरोना एक साधन झालं आहे. डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी या सगळ्यांनी कोरोना रुग्ण वाचवले. शासनाने मात्र दुर्दैवाने कोविड-१९ चे नाटक पुन्हा सुरू केलं आहे. ज्या शहरात तुम्ही लॉकडाउन केलं तिथलं कोविड थांबलं का? लॉकडाउनला लोकांचा विरोध आहे, अर्थव्यवस्था कोलमडली आहे. या गोष्टीचा विचार करून लॉकडाउनबाबत विचार केला पाहिजे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

पंढरपुरात वंचितचा उमेदवार असणार आहे. आम्ही एक जातीय राजकारण करत नाही. पडळकर भाजपमध्ये गेले, त्यांनी स्वतःची अवस्था वाईट करून घेतली. केंद्रात सरकार आहे, धनगर समाज त्यांना विचारत आहे की, आरक्षण मिळवून द्या. गोपीचंद यांची कमतरता भासेल असं वाटत नाही’, असं म्हणत आंबेडकर यांनी पडळकरांना टोला लगावला. तसेच अजित पवार यांचा खोटारडेपणा उघड झाला आहे. सभागृहात स्थगिती देतात, पुन्हा वीज तोडण्याचे आदेश देतात. पंढरपूर मतदारसंघातील लोकांना संधी आहे, खोटारड्यांना जागा दाखवण्याची, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER