राज्यात आज ३५ हजार ९५२ नव्या कोरोनाबाधितांची भर, १११ रूग्णांचा मृत्यू

Coronavirus Update

मुंबई :- आता राज्यात करोना (Corona) विषाणूने डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. दररोज नव्या कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. सोबतच मृत्यूंच्या संख्येतही कमालीची वाढ होत असल्याचं दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात १११ रूग्णांचा मृत्यू झाला तर ३५ हजार ९५२ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर २.७ टक्के एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण २,६२,६८५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

तर, आज २० हजार ४४४ रुग्ण देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २२,८३,०३७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८७.७८ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८८,७८,७५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २६,००,८३३ (१३.७८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १३,६२,८९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १३,७७० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER