ओडीसा राज्यात कलेक्टरसाहेबांची कमाल वीजेशिवाय चालणाऱ्या कुलरमुळं शेतकऱ्यांची केली मोठी मदत

Odisha

शेती मालाला मिळत नसलेला भाव शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या बनलाय. उत्पादनांचा त्यांना योग्य भाव मिळत नाहीये. शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणीतून जावं लागत असल्याच चित्र आहे. मातीची सकसता कमी होणं. पोषणद्रव्यांची कमतरता. अवकाळी पाऊस, पिकांवरील रोग आणि पिकाची छाटणी केल्यानंतर साठवण्यासाठी न मिळणारी जागा. ज्यादिवशी भाजीपाला काढून बाजारात नेला जातो आणि त्यादिवशी त्याची विक्री झाली नाही तर शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागतंय.

ज्या क्षेत्रात तापमान जास्त आहे तिथं शेतकऱ्यांना मोठ्या नूकसानीला सामोरं जावं लागतंय. शेतकऱ्यांच्या या समस्येवर उपाय म्हणून ओढीशाच्या संदुरगड जिल्हा प्रशासनाने नामी युक्ती शोधून काढलीये.

शेतकऱ्यांसाठी बाष्पीकरण कुलर त्यांनी मागवलेत. या कुलरमध्ये शेतकरी एका आठवड्यापर्यंत भाजीपाला साठवून ठेवू शकतात. विशेष गोष्ट ही आहे की हे कुलर वीजेवरती नाही तर पाण्यावरती चालतात.

मुंबईच्या रुकार्ट टेक्नोलॉजी कंपनीच्या संयुक्त माध्यमाने जिल्हा प्रशासनानं हे काम केलय. लघू उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ही कंपनी काम करते. त्यांनीच या कुलरची संकल्पना सर्वात आधी बाजारात आणली. वीटा आणि सिमेंटचा टँक बनवून त्यात कुलर बनवण्याचे तंत्र या कंपनीने विकसीत केलंय.

‘कल्याणी बचत गट’ आणि ‘देशप्रेमी उत्पादक समूह’ या दोन संस्थाशी जोडलेल्या महिला शेतकरी आता खुष आहेत.. जेव्हा त्यांनी कलेक्टर साहेबांकडून या योजनेची माहिती घेतली, तेव्हा त्या आनंदी होत्या त्यांनी आधीच कंपनीशी बोलणं करुन घेतलं होत. नंतर त्यांनी या भाजीपाल्याच्या कुलरबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली. त्यांनी सर्व सामग्री पाठवली. सर्व सामग्रीतून शेतकऱ्यांनी कुलर बनवला. या कुलरसाठीव वीजेची गरज नव्हती आमच्यासाठी ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची गोष्ट होती.

या कुलरमध्ये सात दिवस भाजीपाला खराब होत नाही असं शेतकऱ्यांच्या ऐकण्यात आहे. पण खरं सांगायचं तर सातदिवसाहून जास्त काळ इथं भाजीपाला जसाच्या तसा राहतो. जिल्हा प्रशासनाच्या या कल्याणकारी निर्णयामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. असंही शेतकरी बोलतायेत.

आतापर्यंत ५० कुलर बसवण्यात आलेत. एका कुलरचा वापर दोन शेतकरी आरामात करु शकतात. आणखी ५० कुलर बसवण्याच्या तयारीत जिल्हा प्रशासन आहे.

कोणत्याही सावलीच्या ठिकाणी कुलर बनवणं शक्य आहे. दररोज यात पाणी ओतण्याचे श्रम घ्यावे लागतात. तीनचार दिवसानंतरही भाजीपाल्यांची विक्रीकरुन चांगल उत्पन्न शेतकरी घेवू शकतात. प्रशासनाच्या निर्णयाचा सारेच जण फायदा घेताहेत.

ओडीसासारख्या मागास भागात जिथं वीजही मोठ्या मुश्किलीनं पोहचते तिथं शेतकऱ्यांसाठी प्रशासनाने भाजीपाला साठवणूकीसाठी कुलर पोहचवलेत ही मोठी अभिमानाची गोष्टय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER