राज्यात ६३ हजार ७२९ करोनाबाधित वाढले, ३९८ रूग्णांचा मृत्यू

Coronavirus-Maharashtra

मुंबई :- राज्यात दिवसेंदिवस करोनाचा (Corona) संसर्ग अधिकच झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित आढळून येते असून, रूग्ण मृत्यूमध्येही वाढ सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात १५ दिवसांसाठी लॉकडाउन देखील जाहीर करण्यात आलेला आहे. मात्र तरी देखील करोनाबाधितांची संख्या ही वाढल्याचे समोर येत आहे. आज दिवसभरात राज्यात ६३ हजार ७२९ करोनाबाधित वाढले असून, ३९८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातीलर मृत्यू दर १.६१ टक्के आहे. राज्यात आजपर्यंत ५९ हजार ५५१ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.

दरम्यान, आज ४५ हजार ३३५ रूग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३०,०४,३९१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८१.१२ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,३३,०८,८७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३७,०३,५८४ (१५.८९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५,१४,१८१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५,१६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६,३८,०३४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button