‘दक्षिण’मध्ये ऋतुराज पाटील मोठ्या मताधिक्याच्या दिशेने

Ruturaj Patil

कोल्हापूर : राज्य विधानसभेच्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज संजय पाटील मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असे संकेत आहेत. भाजपचे विद्यमान आमदार अमल महादेवराव महाडिक यांच्याशी त्यांचा अत्यंत अटीतटीचा सामना होईल अशी अपेक्षा होती. मात्र पहिल्या फेरीपासून ऋतुराज पाटील यांनी आघाडी घेतली होती. ती पाचव्या फेरीअखेर कायम होती. पाचव्या फेरीअखेर ऋतुराज यांची आघाडी 17210 मतांची होती.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९

फेरीनिहाय ऋतुराज पाटील यांचे मताधिक्य वाढतच गेले आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी प्रतिष्ठेची केलेली ही निवडणूक त्यांचा पुतण्या ऋतुराज सहज जिंकून जाईल असे फेरीनिहाय निकालाचे मताधिक्य संकेत देणारे आहेत. पाटील यांचे पारंपारिक कट्टर विरोधक महादेवराव महाडिक व त्यांचे पुतणे धनंजय महाडिक यांची या मतदारसंघात प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण मतमोजणीचा कल पाहता महाडिक काका – पुतण्या यांना ‘दक्षिण’चा निकाल धक्कादायक असेल.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ निकाल