लोकप्रीय महाभारत मालिकेतला भीम रिअल लाईफमध्ये होता ऑलम्पिक खेळाडू

In the popular Mahabharata series, Bhim was an Olympic athlete in real life

दुरदर्शनवरची महाराभारत मालिका ( Mahabharata series) तुम्हाला आठवत असेल. प्रत्येक घरात ही मालिका बघितली जायची. त्यावेळी दुरदर्शन एकमेव मनोरंजनाचे साधन होते. या मालिकेतील अनेक पात्रांनी लोकांच्या मनावर राज्य केलं. त्यातलंच एक गाजलेलं पात्र, गदाधारी भीम (Bhim)जो प्रत्यक्षात एक खेळाडू होता. ज्याने क्रिडा क्षेत्रातली ( Olympic athlete) सर्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.

बी.आर. चोपडा निर्मित महाभारत मालिका आपण सर्वांनी पाहिली आहे. लॉकडाऊनमुळं नव्या पिढीला सुद्धा ही मालिका पाहता आली. अनेक दिग्दर्शकांनी वेगवेगळ्या चॅनेल्सवर महाभारत परद्यावर उतारण्याचा प्रयत्न केलाय पण दुरदर्शनवरच्या महाभारताची सर कशालाच आली नाही. ९०च्या दशकात अशी सिरीअल बनवणं अशक्य कोटीच काम होतं. पण बी.आर. चोपडांनी दिवस सात्र मेहनत घेऊन ही अशक्य गोष्टी शक्य केली.

महाभारत मालिकेत भीमाची भूमिका साकारणारे प्रवीण कुमारांनी भीमाला पडद्यावर जिवंत केलं. पण अभिनय क्षेत्रात पाय ठेवण्याआधी ते एक खेळाडू होते. थाली फेक आणि गोळा फेक या खेळात त्यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सत्तरावर भारताच प्रतिनिधीत्व केलंय.

भारताचा वाढवला सन्मान

प्रवीण १९६०-७०च्या दशकात भारतीय अथलेटीक्सचा चेहरा होते. पुरी उंची आणि भारदस्त शरिराच्या जोरावर ते एक व्यावसायिक खेळाडू बनले. त्यांनी १९६६ आणि १९७० मध्ये हॉंगकॉंगच्या आशियायी स्पर्धेत भाग घेत सुवर्ण पदक जिंकलं होतं. १९६६ला किंग्स्टनच्या कॉमन वेल्थ गेम्समध्ये आणि १९७४च्या तेरहानच्या अशियायी स्पर्धेत रौप्य पदक त्यांनी जिकंलय. यासोबतच १९६८ आणि १९७२ला दोनवेळा ऑलम्पिक स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेतला होता.

आंतरराष्ट्रीय स्तरावपर्यंत पोहचण त्यावेळी सोप्प नव्हतं. पण त्यांनी अशक्य गोष्टी शक्य करुन दाखवल्या. त्यांच्या नावाची भारतभर चर्चा होती. यशाच्या शिखरावर असताना मात्र त्यांना क्रिडाक्षेत्र कायमसाठी सोडण्याची वेळ आली. त्यांच्या पाठ दुखीला सुरुवात झाली. पण तरीही ऑलम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी १९६८ला चाचणी दिली होती. यावेळी चाचणीतच त्यांनी विक्रम केला. त्यांनी थाळी ७० मीटर दूर फेकली. त्यांच्या आधी हंगेरी आणि रशियाच्या एथलिट्सच्या नावावर हा विक्रम होता. पण ऑलम्पिकमध्ये त्यांना यश मिळालं नाही. मॅक्सिकोमध्ये ते २०व्या तर म्यूनिखमध्ये ते २६व्या स्थानावर राहिले.

अभिनयाला सुरुवात

खेळातील यशस्वी कार्यकाळानंतर त्यांनी १९८० ला अभिनयाच्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली. खेळात त्यांना भरपूर प्रेम मिळालं. लोकप्रियतेच्या शिखरावर ते होते. खेळ सोडल्यानंतरही त्यांची लोकप्रियता टिकून राहवी अशी त्यांची इच्छा होती. म्हणूनच ते अभिनयाकडे वळाले. रविकांत नागाइच दिग्दर्शित ‘फर्ज’ या सिनेमातून त्यांनी सिनेक्षेत्रात पाऊल ठेवलं. पण त्यात त्यांना कोणताच डायलॉग नव्हता. नंतर ‘रक्षा’ या चित्रपटात त्यांना ब्रेक मिळाला. जेम्स बॉंड स्टाइल या सिनेमात त्यांनी मोठ्या गोरीलाची भूमिका निभावली. यात जितेंद्रही होते.

यानंतर अमिताभ बच्च यांच्या ‘शेहंशाह’ सिनेमात त्यांनी काम केलं. ‘रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप लगते है, नाम है शेहंशाह’ ह्या डायलॉगनंतर अमिताभ बच्चन ज्या गुंडाची धुलाई करतात. त्या गुंडाच्या भूमिकेत प्रवीण कुमार होते. शेहंशाहमुळं त्यांना सिनेक्षेत्रात मोठी ओळख मिळाली. यानंतर एकानंतर एक जमाना, युद्ध, करिश्मा कुदरत का, लोहा, मुहब्बत के दुश्मन या हिट सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं.

नेहमी खलनायकाची भूमिका वटवणाऱ्या प्रवीण कुमारांकडे गुंड म्हणूनच बघितलं गेलं. पण त्यांची इमेज बदलली ‘महाभारतानं.’ या मालिकेनं त्यांना नवी ओळख दिली. आजही भीम म्हणलं की प्रवीण कुमारच अनेकांच्या डोळ्यासमोर उभे राहतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER