ऐन लोकसभा निवडणुकीत नंदलाल होर्डीग्ज ठरतेय चर्चेचा विषय

Latest and breaking maharashtra News Headlines in marathi on Maharashtra Today,ऐन लोकसभा निवडणुकीत नंदलाल होर्डीग्ज ठरतेय चर्चेचा विषय 

ऐन लोकसभा निवडणुकीत नंदलाल होर्डीग्ज ठरतेय चर्चेचा विषय

ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने नंदलालचे भुत पुन्हा एका उपटले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात विविध ठिकाणी नंदलाल लिहिलेले होर्डीग्ज सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजने नंदलाल समितीने ठपका ठेवलेलेल्या नगरसेवकांमध्ये शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांचे सुध्दा नाव होते, त्यामुळे या होर्डीग्जमधून नेमका काय संदेश द्यायचा आहे, अशी चर्चा मात्र शहरात सुरु झाली आहे.

ठाणे महापालिकेत ठेकेदारांना कामे देण्यासाठी त्यांच्याकडून 41 टक्के कमिशन उपटले जात असल्याची तक्र ार शिवसेनेचे तत्कालिन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी 1996 साली केली होती. दिघे यांच्याच तक्रारीनंतर तत्कालीन राज्य सरकारने ठाणो महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी नंदलाल समिती नेमली. या समितीने 1998 साली आपला अहवाल सादर केला. त्यात पालिकेतले 57 तत्कालीन नगरसेवक आणि अधिकारी दोषी आढळले. या सर्वांनी भ्रष्ट मार्गाने लाखो रुपयांची माया जमा केल्याचे समितीने आपल्या अहवालात नमूद केले होते. परंतु, नंदलाल यांनी कारवाईची शिफारस करणारा अहवाल सादर करून तब्बल एक तप लोटले तरी या भ्रष्टाचारी मंडळींना कुठलीही शिक्षा झालेली नाही. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे प्रकरणातील दोषींवर आरोपपत्र दाखल करण्याची परवानगी ठाणो पालिकेच्या सर्वसाधारण सभेने द्यावी, असा प्रस्ताव राज्य सरकारने पालिकेकडे पाठविला होता. कायद्याच्या चौकटीतून हा प्रस्ताव पाठविला गेला असे जरी असले तरी पालिकेच्या सभेला तसा नैतिक अधिकार आहे का, यावरही विचार व्हायला हवा होता. नंदलाल समितीच्या अहवालात सर्वच पक्षाच्या नगरसेवकांना दोषी धरण्यात आले होते. त्यामुळे या अहवाला आधारे दोषारोपपत्र दाखल करण्याच्या प्रस्तावाविरोधात पालिकेत सर्वपक्षीय बचावाची भिंत उभी राहिली. त्यानुसार हा प्रस्ताव ठाणो महापालिकेच्या सभेत चर्चेला आल्यानंतर तो अपेक्षेप्रमाणो एकमताने दप्तरी दाखल करण्यात आला. ज्यांच्यावर दोषी म्हणून समितीने ठपका ठेवला त्यांच्याच हाती स्वत: चा निवाडा करायची संधी आली आणि ते स्वत: ला प्रामाणकिपणाचे स्र्टीफीकेट देऊन मोकळे झाले होते.

ही बातमी पण वाचा : शरद पवार म्हणूनच निवडणुकीतून ‘नौ दो ग्यारह’ झाले : मोदी

दरम्यान, ठाणे महापालिकेने 1क् फेब्रुवारी 2क्15 मध्ये ठाणो महापालिकेचे सेवा निवृत्त अभियंते टी. सी. राजेंद्रन यांच्याविरुध्द न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्याकरीता महासभेने केलेला ठराव विखंडीत करण्याची विनंती केली होती. महासभेने त्यांच्या विरोधातील तो ठराव नामंजुर केला होता. परंतु आता पालिकेने 2015 मध्ये केलेल्या पत्रव्यवहाराची दखल राज्य शासनाने घेतली असून, शासनाने त्यांच्या बाबतीत करण्यात आलेला महासभेतील ठरावच निलंबित केला आहे. या संदर्भातील निर्णय त्यांनी जाहीर केला होता. 18 ऑक्टोबर 2010 मध्ये झालेला हा ठराव ठाणो महापालिकेच्या आर्थिक हिताच्या विरोधात असल्याने हा ठराव महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 451 (1) अन्यवे प्रथमत: निलंबित करण्यात येत असल्याचे शासनाच्या अवर सचिव विभागाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान शासनाने राजेंद्रन यांच्याबाबत जो निर्णय दिला आहे. तो ठाणो महापालिकेतील नंदलाल समितीने ठपका ठेवलेल्या त्या सर्व पक्षीय नगरसेवकांना देखील धक्कादायक ठरला आहे. त्यांच्यावर देखील आता अशा प्रकारे कारवाईची टांगती तलवार उभी राहणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु कारवाई मात्र अद्यापही झालेली नाही. या गोष्टीला सुध्दा आता जवळ जवळ तीन वर्षे होत आली आहेत.

परंतु आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात रणधुमाळीत शहराच्या हरिनिवास सर्कल, राम मारुती रोड, खोपट, आदींसह शहराच्या इतर ठिकाणीसुध्दा लागण्यास सुरवात झाली आहे. यावर होर्डीग्जवर सुरवातीलाच ‘‘नंदलाल’’ असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला असून कोण हवय तुम्हांला स्वच्छ चेहरा की, डागाळलेला असाही उल्लेख करण्यात आला आहे. नंदलाल समितीने ठपका ठेवलेल्या लोकप्रतिनिधींमध्ये शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला होता. त्यामुळेच आता हे होर्डीग्ज चांगलेच वादळ उठविणार असल्याचे बोलले जात आहे. आधी शिक्षणाच्या मुद्यावरुन राष्ट्रवादीने शिवसेनेला अडचणीत आणले होते, आता त्या पाठोपाठ नंदलालचे भुत काढून पुन्हा विचारेंवर अप्रत्यक्षरित्या निशाना साधण्याचे काम करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यातही हे होर्डीग्ज सुशिक्षित आणि सुस्कंृत असलेल्या नौपाडा आणि आजूबाजूच्या परिसरात लावण्यात आले आहे. त्यामुळे याचा परिणामही तितकाच महत्वाचा मानला जात आहे.

ही बातमी पण वाचा : ‘पाणी नाही तर मतदानही नाही’; जनतेचा आक्रोश