येत्या २४ तासांत, मुंबई-ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता

heavy rain in Mumbai-Thane

१२ सप्टेंबरला गणेश विसर्जनाच्या पाऊसाने उघाड दिली त्यानंतर आजपासून पुढचे २४ तास पावसाचे आहेत, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.


मुंबई : १२ सप्टेंबरला गणेश विसर्जनाच्या पाऊसाने उघाड दिली त्यानंतर आजपासून पुढचे २४ तास पावसाचे आहेत, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

हवामान खात्याच्या या इशाऱ्याने पुन्हा मुंबईकर धास्तावले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबई, उपनगरांसह, कोकण किनारपट्टी, गोवा आणि पश्चिम महाराष्ट्रात येत्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

सांताक्रूझ वेधशाळेने गेल्या २४ तासांमध्ये ४१.३ मिमी तर, कुलाबा वेधशाळेने ६.२ मिमी पावसाची नोंद केली आहे.

१ जून पासून कुलाबा वेधशाळाने २३४६.६ मिमी तर, सांताक्रूझ वेधशाळेने ३३९८.६ मिमी पावसाची नोंद केली आहे.

गेल्या २४ तासांमध्ये झालेला पाऊस पाहता मुंबई, उपनगरे आणि ठाणे जिल्ह्यात रिमझिम ते मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाचे (पश्चिम विभाग) उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.