नव्या वर्षात शिक्षणसेवक भरतीचा बार उडणार

नववी ते बारावीसाठी दोन हजारांवर जागा भरणार

शिक्षण सेवक भरती

पुणे : नववर्षात जानेवारी महिन्यातच संबंधित शिक्षकांची निवड यादी जाहीर करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुलाखतीसह साधारण साडेतीन हजार पदे आणि मुलाखतीविना अडीच हजार अशी किमान सहा हजार पदांवर भरती प्रक्रिया राबविता येणार आहे. डिसेंबर महिना प्रक्रियेसाठी जाईल आणि जानेवारीपासून शिक्षकांना नियुक्ती देण्यास सुरुवात होईल. टप्प्याटप्प्याने शिक्षक भरतीची प्रक्रिया पवित्र पोर्टलमार्फतच पूर्ण करण्यात येणार आहे.

कोरोना (Corona) संसर्गामुळे अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणांमावर वित्तीय उपाययोजना करण्यासाठी शिक्षणसेवक पदभरतीस बंदी घातली होती. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली ३ डिसेंबरच्या बैठकीतील निर्णयानुसार पदभरती बंदीतून पवित्र प्रणालीद्वारे सुरू असलेली शिक्षणसेवक पदभरती प्रक्रिया वगळली आहे, असा शासन निर्णय राज्य शासनाच्या कक्ष अधिकारी कविता तोंडे यांनी सोमवारी जाहीर केला. त्यामुळे ‘पवित्र’ शिक्षक भरती पुन्हा सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले.

संस्थास्तरावर शिक्षक भरती होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी, तसेच गुणी उमेदवारांना संधी मिळावी आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी या उद्देशाने राज्य शासनाने २३ जून २०१७ रोजी शासन निर्णय काढला. त्यानुसार सरकारी अनुदानित, खासगी अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये पहिली ते बारावीची शिक्षक भरती केवळ पवित्र पोर्टलच्या माध्यमातून करण्याचे निश्चित केले. त्यानंतर शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झाली. त्याला तब्बल दोन वर्षांचा कालावधी लोटल्यानंतर ९ ऑगस्ट २०१९ रोजी विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मुलाखतीशिवाय नियुक्ती देण्यात येणाऱ्या ५ हजार ८२२ शिक्षकांची निवड यादी पवित्र पोर्टलवर जाहीर झाली. त्यातील साधारण ५ हजार ५१ शिक्षकांना ५ सप्टेंबर २०१९ ला नियुक्ती दिली. मात्र, नियुक्ती प्रक्रिया झालीच नाही. याविरोधात अनेक संघटनांनी आंदोलने, उपोषणे, पदयात्रा काढल्या. आता मात्र राज्य शासनाच्या निर्णयामुळे भरती प्रक्रियेला वेग येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER