लोकसभेत पंतप्रधानांनी केले कृषी कायद्यांचे समर्थन; काँग्रेसचा सभात्याग

modi

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाबाबत धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या कृषी कायद्यांची पाठराखण केली. काँग्रेसच्या सदस्यांनी मोदींच्या भाषणात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला व नंतर सभात्याग केला.

मोदी म्हणालेत, नवे कृषी कायदे लागू झाल्यानंतर कोणतीही मंडई बंद झाली नाही. पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान काँग्रेस खासदारांनी गोंधळ घातला. सुरुवातीला मस्करीत काँग्रेस खासदारांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मोदींनी नंतर मात्र त्यांना समज दिली. हे योग्य नाही, माझ्या मनात तुमच्याबद्दल आदर आहे. तुम्हाला बोलण्याची संधी देण्यात आली होती. आता गोंधळ थांबवा, असे मोदींनी काँग्रेस खासदार अधिर रंजन चौधरी यांना बजावले.

माझ्या भाषणात अडथळे निर्माण करणं ही सुनियोजित रणनीती आहे, असा आरोप मोदींनी केला. मोदींचे भाषण सुरू असतानाच काँग्रेसच्या खासदारांनी सभात्याग केला. यावर मोदींनी काँग्रेसला टोमणा मारला, काँग्रेस ना स्वत:चे भले करू शकत ना देशाचे. काँग्रेस खासदारांची राज्यसभेत वेगळी भूमिका असते आणि लोकसभेत वेगळी!

पंतप्रधानांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

  • हे सभागृह आणि सरकार आंदोलक शेतकऱ्यांचा आदर करतं.
  • दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या आंदोलकांमध्ये अफवा पसरवल्या गेल्या.
  • सातत्याने बातचीत सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आक्षेपांवर चर्चा केली जात आहे.
  • जिथे बदलाची गरज आहे त्यावर विचारही केला.
  • शेतकऱ्यांचा फायदा व्हावा हाच आमचा शुद्ध हेतू आहे.
  • कृषी कायदे लागू झाल्यानंतर कोणतीही मंडई बंद झाली नाही.
  • माझ्या भाषणात अडथळे निर्माण करणं ही सुनियोजित रणनीती आहे.
  • खोट्या अफवा सभागृहाच्या बाहेर आणि आतही परवल्या जात आहेत. आपण पसरवलेल्या अफवांचा पर्दाफाश होऊ
  • नये म्हणून विरोधकांचा प्रयत्न
  • आंदोलक असे आंदोलन करत नाहीत, असे आंदोलन आंदोलनजीवी करतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER