थोर व्यक्तींच्या यादीत बाळासाहेब ठाकरे, सरकारी कार्यालयातही जयंती साजरी होणार

Balasaheb Thackeray

मुंबई : गुरुवारी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे वडील, दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि त्यांचे आजोबा आणि समाज सुधारक प्रबोधनकार ठाकरे यांची नावे थोर व्यक्तींच्यआ यादीत समाविष्ट केली आहे. तसेच त्यांची जयंती सरकारी कार्यालयात साजरा करण्याचेही नमूद केले आहे. पहिल्यांदाच बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा थोर व्यक्तींच्या यादीत सामावेश झाला असल्याने महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi) राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसच्या (Congress) भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेले आहे.

सामान्य प्रशासन विभाग मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात आहे. प्रक्रियेनुसार विभागाने 15 डिसेंबर 2020 रोजी एक अधिसूचना जारी केली होती ज्यात राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वाची नावे आणि राष्ट्रीय दिवसांची यादी होती. गुरुवारी विभागाने जारी केलेल्या सुधारित अधिसूचनेत ज्यांची जयंती साजरी केली जावी अशा चार अतिरिक्त नावांचा समावेश आहे – बाळासाहेब ठाकरे (23 जानेवारी), प्रबोधनकार ठाकरे (17 सप्टेंबर)), बालशास्त्री जांभेकर (16 फेब्रुवारी), ज्यांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाते , आणि देशाचे पहिले कृषीमंत्री राहिलेले भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख (27 डिसेंबर) यांचा नावांचा समावेश आहे. तसेच यापुढे नव्याने समावेश झालेल्या या थोर नेत्यांची जयंती आता सरकारी कार्यलयातही साजरी करण्याच्या सूचना सर्वच विभागांना देण्यात आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER