राज्याला दिलासा, गेल्या २४ तासात तब्बल ८२ हजार २६६ रुग्णांनी कोरोनावर मात

Coronavirus Maharashtra

मुंबई : राज्यात कोरोना (Corona) रुग्णवाढीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र आज राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात आज तब्बल ८२ हजार २६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर राज्यात दिवसभरात ५३ हजार ६०५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्याबरोबरच गेल्या २४ तासांमध्ये राज्यात कोरोनामुळे ८६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ५० लाख ५३ हजार ३३६ वर गेली आहे.

राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आज महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या ५३ हजार ६०५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ही ५० लाख ५३ हजार ३३६ एवढी झाली आहे. तर सकारात्मक बाब म्हणजे आज राज्यात ८२ हजार २६६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात ८६४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ७५ हजार २७७ एवढी झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ४३ लाख ४७ हजार ५९२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सद्यस्थितीत राज्यामध्ये कोरोनाचे ६ लाख २८ हजार २१३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button