गेल्या २४ तासांत राज्यात ५६ हजार ६४७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले

Maharashtra Coronavirus

मुंबई :- राज्यातील कोरोनाबाधित (Corona) रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. राज्यात आज ५६ हजार ६४७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली ५१ हजार ३५६ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ३९ लाख ८१ हजार ६५८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८४.३१ टक्के झाले आहे. राज्यात एकूण ६ लाख ६८ हजार ३५३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आज एकूण ६६९ रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. सध्या मृत्युदर १.४९ टक्के आहे. आतापर्यंत एकूण ७० हजार २८४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button