गेल्या २४ तासात राज्यात ५४ हजार २२ हजार नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Maharashtra Coronavirus

मुंबई : गेल्या दोन-तीन महिन्यापासून राज्यातील करोना (Corona) संसर्ग दिवसेंदिवस मोठ्याप्रमाणावर वाढतच चालला आहे. दररोज मोठ्यासंख्येने करोनाबाधित रूग्ण सापडत आहेत. तर रूग्णांच्या मृत्यू संख्येचा आलेखही चढताच आहे. आज दिवसभरात राज्यात ५४ हजार २२ करोनाबाधित वाढले असून, ८९८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यू दर १.४९ टक्के एवढा आहे. याशिवाय आज ३७ हजार ३८६ रूग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण ४२,६५,३२६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८५.३६ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,८९,३०,५८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४९,९६,७५८ (१७.२७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३८,४१,४३१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८,८६० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, राज्यात आज रोजी एकूण ६,५४,७८८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button