गेल्या २४ तासात राज्यात ४६ हजार ७८१ नव्या कोरोना बाधितांची भर, ८१६ रुग्णांचा मृत्यू

Maharashtra Coronavirus

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येमुळे ठाकरे सरकार चिंतेत होतं. परंतु रुग्णसंख्येत आता हळूहळू घट होत असल्याचं दिसून येत आहे. राज्यात आज ५८ हजार ८०५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे राज्यातल्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ४६ लाख १९६ इतकी झाली आहे. तर राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ८८.०१ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर राज्यात आज ४६हजार ७८१ नव्या बाधितांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आता ५ लाख ४८ हजार १२९ वर पोहोचली आहे.

आज राज्यात ८१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातला मृत्यूदर हा गेल्या काही दिवसांपासून १.४९ टक्क्यांवर स्थिरावला आहे. आजही पुण्यातली रुग्णसंख्या ही राज्यात सर्वाधिक म्हणजे ४हजार ३६३ इतकी आहे. तर त्याखालोखाल पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार १५२ नव्या बाधितांची नोंद झाली. तर मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात सर्वात कमी म्हणजे १० नव्या बाधितांची नोंद करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button