कर्नाटक विधान परिषदेत गदारोळ; काँग्रेस आमदारांनी उपसभापतींना खुर्चीवरून खेचले

Karnataka Legislative Council

बंगरुळु : कर्नाटक विधान परिषदेमध्ये मंगळवारी जोरदार गदारोळ झाला. गोहत्याबंदी विधेयक सभागृहात सादर होणार होते. त्याआधीच काँग्रेस (Congress) आमदारांनी उपसभापतींना  खुर्चीवरून खाली खेचले ! सभागृहाचे कामकाज चालू होताच काँग्रेस आमदारांनी, उपसभापतींनी त्यांच्या खुर्चीवर बसणे असांविधानिक आहे असे म्हणून उपसभापतींना जबरदस्तीने खुर्चीवरून खेचून बाहेर काढले. उपसभापतींना सोडवण्यासाठी मार्शल्सना हस्तक्षेप करावा लागला.

उपमुख्यमंत्री अश्वथानारायण (Ashwathanarayana) आणि काँग्रेस आमदारांमध्ये शाब्दिक वादावादी सुरू झाली. काँग्रेसने विधान परिषदेच्या आमदारांसाठी व्हीप जारी केला होता. गोहत्याबंदी विधेयकाविरोधात काँग्रेसला मतदान हवे होते. काँग्रेसला विधेयकाविरोधात मतदान करायचे होते. जेडीएसला ते विधेयक सिलेक्ट समितीकडे पाठवायचे होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER