
हैदराबाद :- महापालिका निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारली. गेल्या वेळी ४ जागांवर असलेल्या भाजपाने ४९ जिंकल्या. भाजपा दुसऱ्या क्रमांकावर राहिली. ओवेसींचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.
सर्वात जास्त ५६ जागा टीआरएसला मिळाल्या. भाजपाची कामगिरी सर्वात जास्त लक्षवेधी ठरली. भाजपाने मोठी ताकद लावली होती. अमित शाह यांच्यापासून ते स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यापर्यंत अनेक नेत्यांनी कंबर कसली होती. २०१६ च्या तुलनेत प्रचंड यश मिळवले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला