सलग चौथ्या आयपीएलमध्ये एखाद्या संघाने मध्येच बदलला आपला कर्णधार

David Warner - Kane Williamson - Maharashtra Today
David Warner - Kane Williamson - Maharashtra Today

आयपीएलमध्ये (IPL) खराब कामगिरी होत असल्याने सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) आपल्या नेतृत्वात बदल केला आहे. त्यांनी कर्णधारपदावरून ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला (David Warner) हटवून न्यूझीलंडच्या केन विल्यम्सनला (Kane Williamson) कर्णधार म्हणून नेमले आहे. सहा सामन्यांपैकी फक्त एकच जिंकता आल्याने सनरायझर्सने हा बदल केला आहे. गेल्यावर्षीसुध्दा कोलकाता नाईट रायडर्सने असाच आठव्या सामन्याआधी कर्णधार बदलला होता आणि दिनेश कार्तिककडून ओईन मॉर्गनकडे नेतृत्व सोपवले होते. 2018 च्या आयपीएलपासून प्रत्येकच आयपीएलमध्ये कुण्या ना कुण्या संघाने मध्येच आपला कर्णधार बदलला आहे.

विल्यम्सनकडे दुसऱ्यांदा सनरायझर्सचे नेतृत्व आले आहे.याच्याआधी 2018 मध्ये वाॕर्नरवर बाॕल टॕम्परिंगमुळे बंदी आली होती त्यावेळी विल्यम्सननेच सनरायझर्सचे नेतृत्व केले होते आणि त्याने 17 सामन्यात 735 धावा करत सनरायझर्सच्या संघाला अंतिम फेरीत पोहोचवले होते. त्यानंतर 2019 मध्येही विल्यम्सनकडेही नेतृत्व होते आणि 2020 पासून वाॕर्नर कर्णधार बनला.

आयपीएलमधील नेतृत्वबदल

2008- हरभजन/ शॉन पोलाॕक/ सचिन तेंडूलकर (मुंबई इंडियन्स)

2008- लक्ष्मण/ गिलख्रिस्ट
(डेक्कन चार्जर्स)- सातवा सामना

2009- पीटरसन/ कुंबळे
(राॕयल चॕलेंजर्स )- सातवा सामना

2012- व्हेट्टोरी/ कोहली
(राॕयल चॕलेंजर्स) – आठवा सामना

2012- संगकारा/ व्हाईट
(डेक्कन चार्जर्स)- आठवा सामना

2013- रिकी पोंटींग/ रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स)

2013- धवन/ सॕमी
(सनरायजर्स हैदराबाद)- 11 वा सामना

2015- शेन वाॕटसन/ स्टिव्ह स्मिथ (राजस्थान राॕयल्स)

2016- डेव्हीड मिलर/ मुरली विजय
(किंग्ज इलेव्हन पंजाब)-सातवा सामना

2018- गौतम गंभीर/ श्रेयस अय्यर
(दिल्ली कॕपिटल्स)- सातवा सामना

2019- अजिंक्य रहाणे/ स्टिव्ह स्मिथ
(राजस्थान राॕयल्स)- सातवा सामना

2020- दिनेश कार्तिक/ ओईन मॉर्गन
(कोलकाता नाईट रायडर्स)- आठवा सामना

2021- डेव्हिड वाॕर्नर/ केन विल्यम्सन (सनरायझर्स हैदराबाद) – सातवा सामना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button