महापुरात आणि आता कोरोनाच्या संकटात भाजप चे आमदार जनतेपासून दूरच – पृथ्वीराज पाटील यांची टीका

Prithviraj Patil

सांगली : विकास महाआघाडी सरकारच्या कामावर टिका करणारे सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ हे महापुराप्रमाणेच कोरोनाच्या संकटाच्या काळात जनतेपासुन दुर राहीले आहेत. ग्रीन झोन जाहीर झाल्यानंतर ते बाहेर पडून जनतेच्या काळजीची नौटंकी करत आहेत. राज्यातील सत्ता गेल्यामुळे राजकीय असुयेने त्यांना पछाडले असून त्यांना पोटशूळ उठल्याची जोरदार टीका काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी गुरुवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केली.

पाटील म्हणाले, भाजपने महाविकास आघाडीच्या विरोधात शुक्रवारी आंदोलन पुकारले आहे. स्थानिक आमदार गाडगीळ यांनी महाविकास आघाडीवर टीका करून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. त्यामुळे त्यांना उत्तर देण्याची वेळ आता आली आहे. महापुरात बोटीतून फिरून केवळ फोटोसेशन केले. आज कोरोनाचे संकट आले असताना आमदार गाडगीळ जास्तीत जास्त क्वारंटाईनच राहिले आहेत. महापालिकेत भाजपची सत्ता असताना त्यांचे नगरसेवक कोरोनाच्या संकटात कोठेच दिसत नाहीत. त्यांना मार्गदर्शन करीत कामात सक्रीय ठेवण्याचे कामहू केले चौकट-जनतेसाठी बाहेर न पडता, केवळ राजकारण करीत महाविकास आघाडीवर टीका करणार्‍या आमदार गाडगीळ यांना कामातून चोख उत्तर दिले जाईलच. तरीही यापुढे टीका करताना तोंड सांभाळून बोलावे नाहीतर त्यांच्या कामाचे वाभाडे काढू असा इशाराही पाटील यांनी दिला.

पाच लाख लोकांना देणार प्रतिकार क्षमता वाढीच्या गोळ्या गुलाबराव पाटील होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज व पृथ्वीराज पाटील फौंडेशनच्यावतीने महापालिका क्षेत्रासह सांगली व मिरजेतील ग्रामीण भागात नागरिकांना वाटप करण्यात येणार आहेत. याचा शुभारंभ शनिवारी दुपारी पाच वाजता कृषी सहकार राज्यमंत्री विश्‍वजीत कदम यांच्या हस्ते महापालिकेत होणार असल्याची माहितीही पााटील यांनी यावेळी दिली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला