IPL 2020: एलिमिनेटर सामन्यात हैदराबादने बंगळुरूवर ६ गडी राखून मिळवला विजय, क्वालिफायर २ मध्ये दिल्ली सोबत होणार सामना

Hyderabad beat Bangalore by 6 wickets

युएईत खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या २०२० च्या १३ व्या सत्रात २०१६ च्या विजेता सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सहा विकेट्सने पराभव करून दुसर्‍या क्वालिफायर प्रवेशासाठी प्रवेश निश्चित केला. अबूधाबीच्या शेख जाएद स्टेडियमवर खेळलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करत वॉर्नरच्या संघाला विजयासाठी १३२ धावांचे लक्ष्य दिले होते. आरसीबीकडून एबी डिव्हिलियर्सने ५६ धावा फटकावल्या. शेवटच्या षटकांपर्यंत खेचत आणलेल्या या सामन्यात केन विल्यमसनच्या ५० धावांच्या शानदार खेळीमुळे हैदराबादने चार गडी गमावून लक्ष्य गाठले.

बंगळुरूकडून मोहम्मद सिराजने २८ धावांत दोन गडी बाद केले तर फिरकीपटू अ‍ॅडम जम्पा आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. पहिल्या क्वालिफायरमध्ये मुंबई इंडियन्सकडून पराभव झालेला दिल्ली कॅपिटलसशी हैदराबादचा सामना आता दुसर्‍या क्वालिफायर मध्ये होईल. दिल्ली-हैदराबाद यांच्यातील विजयी संघ १० नोव्हेंबरला मुंबई इंडियन्सशी सामना करेल, ज्यांनी सहाव्या वेळी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER