IPL: दिल्ली पहिल्यांदा फायनलमध्ये, सोशल मीडियावर वर्चस्व राखले शिखर धवनने

Shikhar Dhawan

IPL १३ च्या क्वालिफायर -२ मध्ये दिल्ली कॅपिटलने सनरायझर्स हैदराबादचा १७ धावांनी पराभव केला. यासह दिल्ली कॅपिटलने प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला, जिथे त्यांचा सामना १० नोव्हेंबरला चार वेळेस चॅम्पियन मुंबई इंडियन्सशी होईल.

दिल्ली कॅपिटलसच्या विजयात शिखर धवन चमकला जिथे सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध ७८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली आणि IPL १३ मध्ये ६०३ धावा पूर्ण केल्या. या शानदार कामगिरीनंतर शिखर धवनचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल संघाने २० षटकांत ३ गडी गमावून १८९ धावा केल्या आणि सनरायझर्स हैदराबादला विजयासाठी १९० धावांचे लक्ष्य दिले. शिखर धवनने दिल्ली कॅपिटलसाठी सर्वाधिक ७८ धावा केल्या. धवनच्या डावात पाच चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ २० षटकांत ८ गडी गमावून १७२ धावा करू शकला आणि दिल्लीने विजय नोंदविला. शिखर धवनने २६ चेंडूत अर्धशतक ठोकले. धवन आता IPL मध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज ठरला आहे.

शिखर धवनने १७५ IPL सामन्यांमध्ये ५१८२ धावा केल्या आहेत. धवनच्या पुढे विराट कोहली (५८७८), सुरेश रैना (५३६८) आणि डेव्हिड वॉर्नर (५२५४) आहेत. धवन हा IPL २०२० मध्ये ६००+ धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. धवनपेक्षा जास्त धावा केएल राहुलने (६७०) केल्या आहेत. धवन दिल्ली कैपिटल्स कडून एक सीजन मध्ये ६०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणारा दुसरा फलंदाज बनला आहे, २०१८ मध्ये ऋषभ पंतने दिल्लीसाठी ६०० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER