दिल्लीच्या आंदोलनात शेतकऱ्यांपेक्षा हमाल जास्त, सगळे भामटे – रघुनाथदादा पाटील यांची टीका

Raghunath Dada Patil

अहमदनगर : दिल्लीत सुरू असलेले आंदोलन शेतकऱ्यांचे नाही. या सर्वांना फसवून आणले आहे. हे सर्व भामटे लोक आहेत. दिल्लीतील हे आंदोलन म्हणजे दुसरे शाहीनबाग आहे; त्याला काही अर्थ नाही, अशी झणझणीत टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली. (Raghunath Dada Patil criticizes Delhi farmers protest)

आंदोलनात शेतकऱ्यांपेक्षा हमाल जास्त

केंद सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात देशभरात असंतोषाचं वातावरण आहे. अकरा दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि हरियाणा येथील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. त्यांनी दिल्लीच्या सीमा रोखल्या आहेत.केंद्र सरकारने लागू केलेले कायदे हे शेतकरी हिताचे नाहीत. ते तत्काळ रद्द करा, अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे.

अडचणीच्या कायद्यांबद्दल कोणी बोलत नाही !

शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या या आंदोलनला कडाडून विरोध केला आहे. ते म्हणालेत, हे फसवून आणलेल्या शेतकऱ्यांचे आंदोलन आहे. आंदोलनात शेतकऱ्यांपेक्षा आडतीवर काम करणारे, हमाल जास्त आहेत. यामुळे हे शेतकऱ्यांचे आंदोलन आहे, असे मी मानत नाही. यापूर्वी शेतकऱ्यांच्या विरोधात असे काही कायदे झाले आहेत, ज्या कायद्याविरुद्ध दिल्लीच्या आंदोलनात कुणाही बोलत नाहीत. त्या कायद्यांपासून शेतकऱ्यांना खरा त्रास आहे. दिल्लीच्या आंदोलनात त्या कायद्यांचा उच्चार करायलासुद्धा कुणी तयार नाही!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER