देशात सर्वाधिक रेमडेसिविर केंद्राने महाराष्ट्राला दिले; फडणवीस यांनी दिली आकडेवारी

Devendra Fadnavis-Maharashtra Remdesivir

मुंबई :- रेमडेसिविरच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकार महाराष्ट्रावर अन्याय करीत असल्याचा आरोप महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधील मंत्री, सरकारमधील तिन्ही पक्षांचे नेते करीत असताना केवळ दहा दिवसांसाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला रेमडेसिविरच्या तब्बल ४ लाख ३५ हजार कुपी दिल्या आहेत.

रेमडेसिविरसाठी लोकांची अक्षरश: वणवण सुरू असताना केंद्रातील नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारने महाराष्ट्राला मोठा दिलासा दिला  आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शनिवारी सायंकाळी ट्विट करून ही माहिती दिली. २१ एप्रिल ते ३० एप्रिल या दहा दिवसांसाठी केंद्राने कोणत्या राज्याला किती रेमडेसिविर वितरित केले आहेत याचा चार्टच फडणवीस यांनी दिला आहे. फडणवीस यांच्या टिष्ट्वटनंतर तासाभराने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कार्यालयाने एक प्रसिद्धी पत्रक काढून महाराष्ट्राला ४.३५ लाख रेमडेसिविर कुपी केंद्राकडून वितरित करण्यात आल्याची पुष्टी केली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यासाठी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहेत.  फडणवीस यांनी रात्री एक टिष्ट्वट करून केंद्र सरकारने रेमडेसिविर कुप्यांच्या राज्यावार वितरित केलेल्या कुपींची आकडेवारी दिली. त्यानसुार, २१ एप्रिल ते ३० एप्रिल या केवळ दहा दिवसांसाठी केंद्र सरकारने १६ लाख रेमडेसिविर कुपी वितरित केल्या असून त्यातील ४ लाख ३५ हजार म्हणजे तब्बल ३४ टक्के एकट्या महाराष्ट्रासाठी वितरित करण्यात आले आहेत.

या दहा दिवसांसाठी रेमडेसिविरच्या किती कुपी कोणत्या राज्यांना मिळाल्या याचा चार्ट फडणवीस यांनी दिला आहे. त्यातील काही राज्ये अशी – महाराष्ट्र – ४.३५ लाख, बिहार ४० हजार, आसाम ७५००, आंध्र प्रदेश ६० हजार, केरळ २४ हजार, मध्य प्रदेश ९५ हजार, दिल्ली ७२ हजार, गुजरात १.६५ लाख, कर्नाटक १.२२ लाख, राजस्थान ६७ हजार, तमिळनाडू ६५ हजार, उत्तर प्रदेश १.६१ लाख, पश्चिम बंगाल ३२ हजार, तेलंगणा ३५ हजार.

Maharashtra Remdesivir

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button