ज्या प्रकरणाने शिवेंद्रराजेंसोबत संघर्ष पेटला त्या प्रकरणात अखेर उदयनराजेंची निर्दोष मुक्तता

udyanRaje

सातारा :  साताऱ्यातील आनेवाडी टोल नाका हस्तांतरणावरून खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांच्यात २०१७ मध्ये मोठा संघर्ष पेटला होता. या प्रकरणी अखेर सुनावणी पूर्ण झाली असून उदयनराजे यांच्यासह ११ कार्यकर्त्यांची वाई कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे.

आज या प्रकरणाची सुनावणी वाई कोर्टात पूर्ण झाली आहे. त्यानुसार, उदयनराजे आणि समर्थक वाई कोर्टात हजर झाले होते. आनेवाडी टोल नाका हस्तांतरण प्रकरणाचा काय निकाल लागणार याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, या प्रकरणी खासदार उदयनराजे यांच्यासह ११ कार्यकर्त्यांची वाई कोर्टाने निर्दोष मुक्तता केल्याने उदयनराजेंना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आनेवाडी टोल नाक्याच्या हस्तांतराच्या मुद्यावरून कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री सुरुची बंगल्यासमोर खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला होता.

आनेवाडी टोल नाक्यावर जमावबंदीचे आदेश असतानादेखील उदयनराजे आणि त्यांच्या  समर्थकांनी जमाव केल्याने वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखला झाला होता. अखेर उदयनराजेंची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER