बदलत्या हवामानामुळं शेती संकटात, काय करता येतील उपाय?

Agricultural Crisis Due To The Changing Climate

गेल्या तीन चार वर्षापासून वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलामुळं मोठ्या नूकसानाला शेतकरी सामोरे जात आहेत. हाती आलेल्या पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळं उत्पन्नही मिळत नाहीये आणि जमिनीची धूपही होतीये

वेगवेगळ्या ठिकाणाच्या जमिनींवर हवामानाचा परिणाम होत असल्याने प्रत्येक ठिकाणची जमिन आणि त्यानूसार घेतली जाणारी पिकं वेगळी असतात. हवामानातील सुर्यप्रकाश, वारा. पाऊस इत्यादींचा जमिनीवर सातत्यानं प्रभाव पडत असतो. गेल्या काही वर्षांमध्ये निसर्गचक्रात घडणारे बदल. अवेळी होणारा पाऊस. वाढती उष्णता यामुळे हवामानात सतत बदल घडताहेत व हवामानातील या बदलामुळे मातीवर आणि परिणामी पिक उत्पादनावर ही याचा प्रभाव पडतोय. गारपीट, अवर्षण, अवकाळी पाऊस यामुळे जमिनीमध्ये नेमकाय काय आणि कसा बदल होतो हे तुम्ही समजून घ्यायला हवे.

गारपीट, पाऊस आणि वाऱ्यामुळे जमिनीची धुप

गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या काही भागात मुख्यतः पश्चिम महाराष्ट्रात आणि सोबतचं मराठवाडा विदर्भ या तिन्ही विभागांमध्ये कमी कालावधीत जास्ती तिव्रतेने पाऊस पडतो आहे. गारपीट आणि अकस्मीत पावसामुळं मातीतील सुपीकता असणारे घटक वाहून जातात आणि त्यामुळं जमिनीचा कस ढासळतोय.

अगदी या प्रमाणेचं कोरडवाहू जमिनींची उन्हाळ्यामुळं आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळं मातीची धुप होण्याचं प्रमाण वाढलयं याचा परिणाम पिकांचा दर्जा ढासळण्यात झाल्यानं शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला तोंड द्याव लागतं आहे.

जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठीचे प्रतिबंधात्मक उपाय

शेतजमिनींचा विचार केल्यास दर्जेदार पिकउत्पादनासाठी मातीचा कस टिकवून ठेवणं अवश्यक असतं. जमिनीच्या सुपीकतेवर याचा नेमका कसा परिणाम होतो हे तुमच्या लक्षात आलं की संभाव्य उपाय योजना करुन तुम्ही जमिनीची सुपीकता टिकवून ठेवू शकता.

१. पिकपद्धतीमध्ये बदल आवश्यक पिके उतारास आडवी पेरवीत ज्यामुळं शेतातील अतिरीक्त पाणी शेतातून बाहेर पडण्यास मदत होईल.

२. कव्हर क्रॉप्स, शेत जमिन अच्छादित करणारी पिकं घ्यावीत. धुपिस प्रतिबंध करणारी पिकं घेतल्यास जास्त फायदा होतो.

३. पिक वाढीसाठी गरजेच्या असणाऱ्या आवश्यक अन्नद्रव्य संवर्धन आणि पुनर्भरण होईल या पद्धतीने उपाय करायला हवेत.

४. सुधारीत सिंचनाचा वापर करावा. पिकांना पारंपरिक पद्धतीने पाणी द्यायची पद्धत चुकीची आहे. त्यामुळे भूजल पातळीत घट होते व जमिनीतील पोषण द्रव्य वाहून जातात.

५. मोठ्या पावसानंतर अथवा सोसाट्याच्या वाऱ्यानंतर जमिनीची धुप झाल्याची शंका मनात येता लगेच उपाय योजनांना सुरुवात करावी. अन्नद्रव्य फवारणी, बियाणांतील बदल. पेरणींच्या अंतरातील बदल इत्यादींचा वापर डॅमेज कंट्रोलसाठी केला जावू शकतो.

वरील उपाययोजनांचा आढावा घेत उपाय योजना केल्यास जमिनीचा स्तर सुधारण्यास मदत होते. आणि धुप झाल्याने वाहून गेलेल्या शेतजमिनीतील पोषणद्रव्यांची तुट ही भरून काढता येतो.

Disclaimer:- ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER