दुपारी मंत्री धमकी देतात, आणि रात्री फार्मा कंपनीच्या मालकाला दहशतवाद्याप्रमाणे घरातून उचलतात’

Pravin Darekar

मुंबई : काल सायंकाळी रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा पुरवठा करणाऱ्या ब्रूक कंपनीच्या मालकाला पोलिसांनी त्यांच्या घरुन ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशीही केली. आणि आता यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचेराजकीय वादंग निर्माण झाले आहे. संकटाच्या काळात महाराष्ट्राला रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या मालकाला अशाप्रकारे ताब्यात घेणे हा कृतघ्नपणा असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली.

प्रविण दरेकर यांनी आज यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Goverment) गंभीर आरोप केले. ठाकरे सरकारमधील मंत्र्याकडून दुपारी ब्रुक कंपनीच्या मालकाला दम मारला जातो. त्यानंतर संध्याकाळी १० ते १५ पोलीस एखाद्या दहशतवाद्याला अटक करण्यासाठी धाड टाकता त्याप्रमाणे कंपनीच्या मालकाला घरातून उचलतात. हे कोणत्या प्रकारचं विकृत राजकारण आहे, तेच कळत नाही, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली. ब्रुक्स फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांच्याकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलवले होते. महाराष्ट्र पोलीस लोकहितासाठी काम करत आहेत. त्यांच्याकडून केवळ माहिती घेतली जात होती. मात्र एवढ्या रात्री देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे दोन्ही विरोधी पक्षनेते डोकानियाला सोडवण्यासाठी पोलीस स्टेशनला जातात. त्यांना सोडवून आणतात. त्यांना चौकशी सुरू असताना सोडवण्याची घाई का पडली होती? असा सवाल करत मलिक यांनी विरोधकांचं आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button