तामिळनाडूत भाजपला मिळणार मोठ्या नेत्याची साथ

BJP Flags

नवी दिल्ली :- २०२१ मध्ये तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या (Tamil Nadu Assembly Elections) पार्श्वभूमीवर या राज्यात पाय पसरण्यासाठी भाजप अलिगिरी यांच्याशी हातमिळवणी करण्याच्या प्रयत्नात आहेत. अलिगिरी आणि भाजप यांची आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडीबाबत चर्चा सुरू असल्याच्या वृत्ताला राज्यात भाजप आणि अलिगिरी यांच्या गटाने दुजोरा दिला आहे. सर्वकाही भाजपच्या (BJP) य योजनेप्रमाणे घडल्यास अलिगिरी २१ नोव्हेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची चेन्नई दौऱ्याच्या वेळी भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

नुकताच भाजपने काँग्रेसच्या (Congress) खुशबू यांना पक्षात आणले आहे. त्यानंतर दिवंगत एम.के. अलिगिरी यांचे ज्येष्ठ पुत्र आणि डीएमके अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांचे बंधू एम.के. अलिगिरी यांचे समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. भाजप तामिळनाडू या माध्यमातून २०२१ च्या विधानसभेत पक्षविस्तारण्याच्या तयारीत आहे. अलिगिरी आणि अमित शाह यांची चेत्नई येथे २१ नोव्हेंबरला भेट होणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी मात्र या घडामोडीबाबत अनभिज्ञता व्यक्त केली आहे, तर अलिगिरी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र, अलिगिरी यांच्या निकटवर्तीयांच्या म्हणण्यानुसार, भाजपसोबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. एम.के. स्टॅलिन यांनी अलिगिरी यांना बाजूला सारले आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, अलिगरी यांच्या नवीन पक्षाचे नाव कलेंगर डीएमके किंवा केडीएमके राहण्याची शक्यता आहे. अलिगिरी यांचा मुलगा दयानिधी यांचे या पक्षाला समर्थन असेल, ज्या प्रमाणे स्टॅनिल यांचे सुपुत्र उदयानिधी हे डीएमकेच्या युवा आघाडीचे प्रमुख आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER