धनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ अमोल मिटकरी भाजपवर कडाडले, भाजपला विकासावर बोलायला वेळ नाही ….

Dhanajay Munde-Amol Mitkari-Chandrakant Patil

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari)यांनी भाजपवर पुन्हा निशाणा साधला आहे. भाजपला विकासावर, शेतकरी आंदोलन, पेट्रोल डिझेल दरवाढ या मुद्यांवर बोलायला वेळ नाही. तसेच, केंद्र सरकारविरोधात असलेला रोष वळवण्याचा प्रयत्न चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) करत असल्याचा आरोपही अमोल मिटकरी यांनी केला.

धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाला आहे. आज पत्रकार परिषद घेऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंडेंनी राजीनामा न दिल्यास सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आम्ही जर तोंड उघडले तर भाजप नेत्यांचे काळे कारनामे पडद्यासमोर यायला वेळ लागणार नाही असे अमोल मिटकरी म्हणाले.

अमोल मिटकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लस का टोचून घेतली नाही, असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. ते म्हणाले, देशाचे पंतप्रधान मोदी यांच्यावर भारतीय जनता पार्टीचा प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी आधी मीडियासमोर येऊन लस टोचून घ्यावी. म्हणजे आमचाही त्यावर विश्वास बसेल. मोदी सुरक्षित तर देश सुरक्षित असेल. म्हणून आधी मोदींनी मीडियासमोर लस टोचून घ्यावी, असे वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER