विधानपरिषदेच्या सहा आणि धुळे-नंदुरबार पोटनिवडणुकीचा फैसला, मतमोजणीला सुरूवात

Maharashtra Legislative Council

मुंबई :- राज्यात महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) स्थापन झाल्यानंतर पहिल्याच स्थानिक निवडणुकीला सामोरं जात आहे. राज्यातील विधानपरिषदेच्या ३ पदवीधर, २ शिक्षक मतदारसंघासाठी आणि एका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी १ डिसेंबरला मतदान झालं. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघासाठी मतदान झालं आहे. आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे.

राज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ही पहिली मोठी निवडणूक असल्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली होती. विधानपरिषदेच्या निकालाचा महाराष्ट्रातील आगामी राजकारणावर परिणाम दिसून येतील.

तर दुसरीकडे, विधानपरिषदेच्या धुळे -नंदुरबार पोटनिवडणुकीसाठी १ डिसेंबरला ९९ टक्के मतदान झालं आहे. आज सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. काँग्रेसमधून भाजपात आलेल्या अमरीश पटेल तसेच भाजप मधून काँग्रेसमध्ये आलेल्या अभिजीत पाटील (Abhijit Patil) या दोघातून कोण बाजी मारतोय हे येत्या काही तासात स्पष्ट होणार आहे. धुळे-नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भाजपचं संख्याबळ पाहता भाजपचं पारडं जड असल्यानं भाजपचाच उमेदवार विजयी होईल असा विश्वास भाजपाच्या गोटातून व्यक्त होत आहे. तर, या निवडणुकीत परिवर्तन होईल असा आशावाद महाविकास आघाडी गटाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER