काही राज्यांत टेस्टिंग नसल्याने रुग्ण दगावत आहेत; आमच्या राज्यात आम्ही हे होऊ देणार नाही- जयंत पाटील

Jayant Patil - Maharastra Today
Jayant Patil - Maharastra Today
  • कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सांगली येथे आढावा बैठक

सांगली : इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात जास्त टेस्टिंग होत आहेत. काही राज्यांत टेस्टिंग नसल्याने रुग्ण दगावत आहेत; मात्र आमच्या राज्यात आम्ही हे होऊ देणार नाही, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली. दरम्यान केंद्र सरकारकडून ज्या प्रमाणात लसी येतील त्या तत्काळ नागरिकांना दिल्या जातील, असा विश्वास जयंत पाटील यांनी जनतेला दिला.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील रुग्णालये, बेड्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, औषधांचा साठा या सर्व गोष्टींचा आढावा घेतला. नागरिकांना बेड्सची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने ऑनलाईन व्यवस्था निर्माण केली आहे, अशी माहितीही जयंत पाटील यांनी यावेळी दिली.

शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक पार पडली. येत्या दोन दिवसांत लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल. शासनाने जाहीर केलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे सांगतानाच काही पॉझिटिव्ह रुग्ण बाहेर फिरताना आढळले आहेत. हे पुन्हा निदर्शनास आल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही जयंत पाटील यांनी दिला. लोकसंख्या आणि कोरोना (Corona) रुग्णांची संख्या जास्त असलेल्या राज्यात अधिक लस पुरवावी ही राज्य सरकारची मागणी असल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button