कोकणात काही ठिकाणी शिवसेनेची मोठी पडझड झाली ; संजय राऊतांची कबुली

Sanjay Raut-Narayan Rane

मुंबई :- राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल (Grampanchayat Election Result) सोमवारी जाहीर झाले. कोकणात पुन्हा एकदा भाजप-सेनेमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळाली. राणेंनी भाजपनेच (BJP) कोकणात बाजी मारल्याचा दावा केलाय तर भास्कर जाधवांनी शिवसेनेला कोकणात अभूतपूर्व यश मिळवल्याचे नमूद केले . अशा सगळ्या राजकीय सुंदोपसुंदीत आजच्या सामनाच्या अग्रलेखातून कोकणात काही ठिकाणी सेनेची मोठी पडझड झाली, अशी कबुली शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली.

कोकणात सिंधुदुर्गात राणेंना (Rane) सत्ता राखण्यात यश आलंय. तसंच अनेक ठिकाणी सेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या ग्रामपंचायतीवर भाजपने कमळ फुलवलं. या विजयानंतर भाजपचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलेला आहे. निकाल हाती आल्यानंतर लगोलग कोकणात राणेंना धक्का देणारा अजून जन्माला यायचाय, अशा शब्दात आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेनेला आव्हान दिले .

आजच्या सामना अग्रेलखातून एकंदर महाराष्ट्र ग्रामपंचायत निकालाचा लेखाजोखा मांडताना राज्यभरातील साडेतीन हजारांवर ग्रामपंचायतींच्या निकालांमध्ये महाविकास आघाडीने चांगलीच मुसंडी मारली आहे, असं सांगताना कोकणात मात्र काही ठिकाणी सेनेची मोठी पडझड झाली, अशी खंत राऊतांनी आवर्जून व्यक्त केली.

विदर्भ-मराठवाड्यात काँग्रेस-राष्ट्रवादीने झेप घेतली आहे, असे सांगताना कोकणात शिवसेनाच आहे, पण काही ठिकाणी मोठी पडझड झाली. त्याची झाडाझडती नंतर घेता येईल. मात्र राज्याच्या संपूर्ण निकालाची गोळाबेरीज पाहता भारतीय जनता पक्षाला लोकांनी झिडकारले आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे .

ही बातमी पण वाचा : आता तरी शिवसेनेनं आपली इज्जत वाचवावी; पश्चिम बंगाल निवडणूक लढवण्यावरून देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER