शिवसेनेत असंतोष; आयारामांना पदं दिल्याने पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत ‘काँग्रेसी भगाव’च्या दिल्या घोषणा

Shiv Sena - Uddhav Thackeray

मुंबई : काँग्रेसमधून (Congress) शिवसेनेत प्रवेश आलेल्यांना महत्त्वाची पदं दिल्यामुळे शिवसेनेतील नाराजीचे वातावरण आहे . शिवसेना (Shiv Sena) समन्वयक प्रकाश वाघ (Prakash Wagh) यांनी बोलावलेल्या बैठकीत ही नाराजी स्पष्टपणे दिसली. निष्ठावंतांना डावलल्यामुळे काँग्रेसधून आलेल्यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी करत येथील शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. या सर्व घडामोडीमुळे सोमवारी झालेल्या बैठकीत तणाव निर्माण झाला होता .

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना समन्वयकांनी सोमवारी बैठक बोलावली होती. या बैठकीला शहरातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिवसेना या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनातील खदखद जाहीरपणे मांडली. पक्षासाठी कित्येक वर्षे निष्ठेने काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना डावलून प्रमुख पदं दिल्याचा आरोप यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. त्यांनतर शहरातील अनेक शिवसेना कार्यकर्त्यांनी ‘काँग्रेसी भगाव’च्या घोषणा देत राजीनामे दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER