शिर्डीत साईभक्तांची लूट करणारे 12 जण अटकेत

Shiradi

शिर्डी : शिर्डीत साईभक्तांची लूड करणा-या 12 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. देशविदेशातून येत असलेलले लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. त्यांना मंदिर, रुम, पूजा साहित्य, पसाद आदिंची काहीच माहिती नसते. याचाच फायदा घेऊन शेकडो तरूणांनी कमिशन एजंटचा धंदा सुरु केला आहे.

हे दलाल मार्गदर्शन करण्याच्या बहाण्याने साईभक्तांना भुलवतात आणि त्यांना झटपट आणि सुलभ देर्शन करून देण्याच्या बहाण्याने हे दलाल भक्तांना सोबत नेतात. मात्र नंतर त्यांच्याकडून अतिरिक्त पैसे उकळले जातात. हार, प्रसाद आदिंसाठी अतिरिक्त पैसे घेतले जातात. अशा 12 दलालांना पोलिसंनी अटक केल्याची माहिती शिर्डीचे उप-पोलिस निरीक्षण सोपान गोरे यांनी सांगितले.

येथे प्रसाद, हार, विक्रीचा अनेक दुकाने आहेत. मात्र वस्तूंचे दर ठरवलेले नसल्याने दुकान, हॉटेल आणि लॉजवर घेऊन जाणा-या दलालांना अवाजवी कमिशन दिले जाते. त्यामुळे शिर्डीत कमी वेळात जास्त पैसे कमाविण्याचा धंदा सुरु झाला आहे.

यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी साई संस्थान, नगरपंचायत आणि पोलिसांची आहे. आता दलालांवर झालेल्या या कारवाईनंतर इतर दलालांचे धाबे दणाणले आहे. ही कारवाई अशीच सुरू राहावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

ही बातमी पण वाचा:- पाताळ भुवनेश्वर गुहेत आहे सृष्टीच्या निर्मितीपासून अंताची माहिती!