संजय राऊतांच्या शब्दकोशात ‘हरामखोर’ म्हणजे ‘नॉटी’!

अतुल भातखळकर म्हणाले - राऊत नॉटी बॉय

Sanjay Raut & Kangana Ranaut

मुंबई : कंगना – संजय राऊत शाब्दिक चकमकीत, संजय राऊत कंगनाला ‘हरामखोर’ म्हणाले होते. त्यांच्या या उल्लेखावर अनेक कलाकारांनी आक्षेप घेऊन राऊतांनी कंगनाची माफी मागावी, अशी मागणी केली. हा वाद संपतच नाही तोवर संजय राऊत कंगनाला ‘नॉटी गर्ल’ म्हणाले.

याबाबत एका हिंदी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राऊत म्हणाले – हरामखोर म्हणजे मराठीत ‘बेईमान’ असा अर्थ होतो. ती नॉटी म्हणजे खट्याळ मुलगी आहे आणि बेईमान आहे. असे मला वाटते ! या वादात सर्वांना चूक ठरवत राऊत म्हणाले – एखाद्या विषयाचे राजकारण करायचे असेल तर कुठल्याही शब्दाचा कुठलाही अर्थ निघू शकतो. महाराष्ट्रात आम्ही जेव्हा हरामखोर असे म्हणतो तेव्हा  त्याचा अर्थ खट्याळ आणि बेईमान असा होतो.

त्याचा फार वेगळा अर्थ काढायची गरज नाही. राऊत यांच्या विधानावर उपरोधिक प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी टोमणा मारला – “हरामखोर म्हणजे नॉटी गर्ल या धर्तीवर… ताकद म्हणजे विश्वासघात, सोनिया म्हणजे नवमातोश्री, अस्मिता म्हणजे रिया, शिवसेना म्हणजे हिंदुत्व आणि राऊत म्हणजे नॉटी बॉय…”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER