सांगलीत शिवसेनेने भाजप ला आंदोलनानेच दिले उत्तर

ShivSena Answer To BJP In Sangli

सांगली : भाजपाच्या महाराष्ट्र बचाव आंदोलनाच्या त्या विरोधात शिवसेना आणि युवा सेना सांगली जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या समर्थनार्थ ‘ आम्ही ठाकरे सरकार सोबत ‘ हे आंदोलन शुक्रवारी सांगली जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये , शहरांत आंदोलन करण्यात आले. शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून हे आंदोलन केल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी सांगितले .

विटा येथील आंदोलनात विभुते सहभागी झाले होते. खानापूर तालुकाप्रमुख सतीश निकम, शहरप्रमुख राजू जाधव, युवासेनेचे जिल्हाप्रमुख मिलिंद कदम आदी यावेळी उपस्थित होते . भाजपचे महाराष्ट्र विषयी असलेल बेगडी प्रेम हे सर्वांना परिचित आहे. गेलेली सत्ता परत येणार नाही, हे आता त्यांच्या लक्षात आलेला आहे. आपले आमदार, खासदार फूटून जाऊ नयेत, म्हणून महाराष्ट्रातील लोकांच्या डोळ्यांमध्ये काहीतरी धूळ फेकण्याचा काम भाजप म्हणून आंदोलनाचे नाटक करत असल्याचा आरोप सेनेकडून करण्यात आला. शिवसेनेचा नाद भाजपाने करू नये , अन्यथा कोरोना संपल्यानंतर शिवसेना जशास तसे आणि शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल , असा इशारा यावेळी देण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला