रत्नागिरी जिल्ह्यात प्रवाशांनी पाठ फिरविल्याने एसटी तोट्यात

ST Bus

रत्नागिरी(प्रतिनिधी) : लॉकडाऊनच्या चौथ्या टप्यात रत्नागिरी जिल्ह्यात काही अटींवर जिल्ह्याअंतर्गत एसटी वाहतूक सुरू करण्यात आली आली तरी आठवडा उलटूनही दिवसभरातील 52 गाड्यांच्या फेऱ्यांना अल्प प्रतिसाद मिळत आहे. 22 प्रवाशी अपेक्षित असताना 3 किंवा 10 ते 12 प्रवासीच मिळत आहेत.

एसटीची प्रवासी वाहतुक सुरू झाली आहे, हे जनतेला माहिती व्हावे, यासाठी एसटीने तोट्यातील या फेऱ्या सुरूच ठेवल्या आहेत. यावरून एसटीभारमान काही वाढता वाढेना, अशी परिस्थिती झाली आहे. जिल्ह्यात 52 एसटीच्या सुमारे 94 फेऱ्या सुरू आहेत. कोरोनाबाबत नागरिकांच्या मनात भीती असल्याने लोक घराबाहेर पडत नसल्याचे यावरून दिसत आहे. लांजा, देवरूख आगारात मात्र 22 प्रवासी मिळत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER