रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’मध्ये साराऐवजी लागणार तृप्ती डिमरीची वर्णी

Ranbir Kapoor - Tripti Dimri

31 डिसेंबरच्या रात्री 12 वाजल्यानंतर आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीच्या मिनिटाला रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) नव्या सिनेमाचा ‘अ‍ॅनिमल’चा टीझर रिलीज करण्यात आला होता. ‘कबीर सिंह’ फेमस दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा (Sandeep Reddy Vanga) या सिनेमाचे दिग्दर्शन करीत असून याची निर्मिती टी सीरीज करीत आहे. सिनेमात रणबीर कपूरसोबत अनिल कपूर (Anil Kapoor) आणि परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) दिसणार आहेत. या सिनेमात दोन नायिकांची आवश्यकता असल्याने दुसऱ्या नायिकेसाठी सारा अली खानचा विचार सुरु होता. साराने ऑडिशनही दिली होती. आणि साराची निवड होईल असे म्हटले जात होते. पण आता साराचा पत्ता कट झाल्याचे दिसत आहे.

सिनेमाची संबंधित सूत्रांनी माहिती देताना सांगितले, सिनेमातील दुसऱ्या नायिकेची भूमिका साकारण्यासाठी सारा अली खानसह अनेक मोठ्या नायिका इच्छुक होत्या. इच्छुक नायिकांच्या ऑडिशनही घेण्यात आल्या होत्या यातच तृप्ती डिमरीही (Tripti Dimri) होती. मात्र सारा अली खानची (Sara Ali Khan) निवड झाली असे सांगण्यात होते. जे खरे नव्हते. निर्मात्यांना सारापेक्षा तृप्ती डिमरीचे ऑडिशन आवडले होते. त्यामुळे त्यांनी तृप्तीचे नाव फायनल केले आहे. तृप्तीने आतापर्यंत फक्त दोन सिनेमे केले आहे. यापैकी एक आहे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला ‘बुलबुल’ आणि दुसरा आहे ‘लैला मजनू’. ‘बुलबुल’मधील तृप्तीच्या कामाची खूपच प्रशंसा झाली आहे. रणबीर कपूर, परिणिती, अनिल कपूर आणि तृप्ती डिमरी हे चारही कलाकार या सिनेमातून प्रथमच एकत्र दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER