रायगडमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन घेतल्यावर ९० जणांची तब्येत बिघडली ; इंजेक्शनचा वापर थांबविण्याचे आदेश

remdesivir injection - Maharashtra Today
remdesivir injection - Maharashtra Today

मुंबई :- देशभरात कोरोनाचे (Corona) संकट आहे. यापार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून गंभीर प्रकृती असलेल्या कोरोना रुग्णांसाठी रामबाण औषध ठरत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रायगडमध्ये या इंजेक्शनच्या वापरामुळे अनेक रुग्णांवर दुष्परिणाम झाले आहेत. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने रायगड जिल्ह्यात तात्काळ रेमडेसिविर इंजेक्शनचा (Remdesivir Injection) वापर थांबवण्याचे आदेश दिले आहेत

रायगड जिल्ह्यात हेटेरो हेल्थ केअर कंपनीकडून वितरीत करण्यात आलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर तात्काळ थांबविण्याचे आदेश अन्न औषध प्रशासनाने जारी केले आहेत. रेमडेसिविर इंजक्शनचा जिल्ह्यात तुटवडा जाणवत होता. आता दुषित रेमडेसिविरचा पुरवठा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. काही रुग्णांना हेटेरो हेल्थकेअर कंपनीची कोविफोर नामक लस दिल्यानंतर त्रास झाल्याची बाब समोर आली. या इंजेक्शनच्या ५०० लसी जिल्ह्याला प्राप्त झाल्या होत्या यापैकी १२० लसी रुग्णांना देण्यात आल्या. यातील ९० जणांना लस घेतल्यावर त्रास जाणवला. रुग्णांवरील प्रतिकूल परिणाम लक्षात घेऊन हेटेरो हेल्थकेअर कंपनीने कोविफोर नावाच्या बँच नंबर एचसिएल २१०१३ इंजेक्शनचा वापर तातडीने थांबविण्याची विनंती केली. याबाबत कंपनीच्या वतीने एक पत्र गुरुवारी जारी करण्यात आले. तांत्रिक कारणामुळे या बॅचमधील सर्व रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर थांबविण्यात यावा असे यात नमुद करण्यात आले.

यानंतर पेण येथील सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन गि. दि. हूकरे यांनी या बॅचमधील सर्व कोविफोर इंजेक्शनचा वापर तातडीने थांबविण्याचे आदेश सर्व रुग्णालयांना आणि वितरकांना दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button